Press "Enter" to skip to content

झी 24 तास चे संपादक निलेश खरे यांची माथेरानला भेट

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।

झी 24 तास, झी न्युजचे संपादक निलेश खरे दोन दिवसांसाठी त्यांच्या कुटुंबियांसोबत माथेरान येथे पर्यटनास आले होते त्यांनी हॉटेल प्रीति येथे वास्तव्य केले होते.

त्यांच्यासोबत माथेरान मध्ये सुरू असलेल्या विकास कामांबाबत आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी बाबत तसेच पर्यायी मार्ग आणि इतर मुद्द्यांवर माजी नगराध्यक्ष अजय सावंत आणि माथेरान नगरीचे विद्यमान नगरसेवक तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांच्या सोबत चर्चा झाली.माथेरानचे विविध प्रश्न,स्थानिकांना आणि येणाऱ्या पर्यटकांना भेडसावत असलेल्या अडीअडचणी आणि सुरू असलेल्या विकास कामांबाबत अनमोल सूचना केल्या.

माथेरान सारख्या या अतिदुर्गम भागात विकासकामे करताना नेहमीच उभावणार्या अडचणी आणि त्यातून शर्थीचे प्रयत्न करीत विकास करताना होत असलेली खरी कसरत निलेश खरेयांच्या निदर्शनास आणून दिली जेणेकरून झी 24 तास, झी न्युजच्या माध्यमातून इथल्या समस्या दूर करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने माथेरान कशाप्रकारे प्रकाश झोतात येऊन इथले पर्यटन वाढून सर्वसामान्य स्थानिक लोकांना,मोलमजुरी करणाऱ्या कष्टकरी जनतेला व्यवसायाच्या संधी कशाप्रकारे उपलब्ध होऊ शकते.इथे पर्यटन क्रांती घडेल यासाठी अजय सावंत आणि प्रसाद सावंत यांनी खरे यांना माथेरानची एकंदरीत भौगोलिक परिस्थिती कथन केली. यावेळी सावंत यांनी निलेश खरे यांचाहॉटेल प्रीती मध्ये शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.