Press "Enter" to skip to content

माथेरानमध्ये कोव्हिड लसीकरण केंद्र सुरू करावे ! नगराध्यक्षा प्रेरणा सावंत

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।

देशात व महाराष्ट्रात कोरोना विषाणू महामारी आजाराबाबत प्रतिबंध उपाययोजना म्हणून शासनाने नागरिकांना टप्प्याटप्प्याने कोव्हिड-१९ चे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.सद्यस्थितीत दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षावरील नागरिकांना आणि ४५ वर्षावरील गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना लस देण्यात येत असून अद्याप माथेरान मध्ये याबाबत शासनाने लसीकरण केंद्राची सोय उपलब्ध केलेली नाही.

माथेरान हे डोंगराळ भागात दुर्गम ठिकाणी वसलेले सुंदर पर्यटनस्थळ असून येथे वाहतुकीची सुविधा अत्यंत कमी स्वरूपात आहे. त्यामुळे ६० वर्षावरील नागरिकांना अथवा अन्य नागरिकांना कर्जत अथवा इतर ठिकाणी जाऊन लस घेणे खूपच त्रासदायक आणि जिकिरीचे आहे.याकामी शासनाने माथेरान नगरपरिषदेच्या बी.जे.रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करावे त्यासाठी आठवड्यातुन किमान तीन वेळा संबंधीत कर्मचारी आणि वॅकसिन उपलब्ध करुन दिल्यास इथल्या सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांना सोयीचे होईल असे माथेरान नगरीच्या उत्तम प्रशासक तथा कार्यशील नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी रायगड जिल्हा शल्यचिकित्सक अलिबाग यांना निवेदन सादर केले आहे.

मार्च २०१९ मध्ये कोरोनाच्या संकटकाळी अनेकदा नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी कोरोना काळात नागरिकांना धीर देत आपली स्वताची आणि त्याचबरोबर इतरांना काही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे वारंवार सूचित केल्यानुसार इथे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी सुध्दा सहकार्य केले होते आणि आजही त्यांच्या सूचनेनुसार नागरीक आपली व इतरांची काळजी घेताना दिसत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.