Press "Enter" to skip to content

भारतीय पत्रकार संघाच्या नवनियुक्त पदाधीकार्‍यांना उरण येथे दिली नियुक्ती पत्रे

सिटी बेल लाइव्ह । उरण । पृथ्वीराज कडू ।

भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष एस .एम .शेख यांनी रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी उरण मधील जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील व उरण तालुका अध्यक्ष पदी पंकज ठाकूर यांची निवड करण्यात केली आहे.सदर निवडीची नियुक्ती पत्र उरण येथील शासकीय गेस्ट हाऊस येथे भारतीय पत्रकार संघाचे कोकण विभाग अध्यक्ष नंद किशोर धोत्रे यांचे हस्ते देण्यात आली. त्यावेळी भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयपाल पाटील व इतर महिला व पुरुष पत्रकार सभासद उपस्थित होते.

यावेळी जयपाल पाटील यांनी उपस्थीत पत्रकारांना मार्गदर्शन करताना पत्रकारीतेतील आव्हाने व पत्रकारीतेचे महत्व समजावून सांगीतले.तर नंद किशोर धोत्रे यांनी पत्रकारीतेतील कायदेशीर मार्गदर्शन केले.यावेळी नवनिर्वाचीत उरण तालुका अध्यक्ष पंकज ठाकूर यांनी उपस्थीतांचे स्वागत केले.तर दिपाली कडेल हीने आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.