सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
रसायनी परिसरातील विभाजित झालेल्या वावेघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. संध्या महादेव कांबळे यांची निवड करण्यात आली असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
वावेघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलास माळी यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी दिनांक 15 मार्च 2021 रोजी ग्रामपंचायत वावेघर येथे उपसरपंच निवडीचा कार्यक्रमात घेण्यात आला. यावेळी सरपंच विजय चव्हाण व ग्रामसेवक दीपक कोंडविलकर यांच्या उपस्थितीत सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.

या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या महायुतीकडून विनोद राठोड तर भारतीय जनता पक्षातर्फे संध्या महादेव कांबळे यांनी आपले नामांकित अर्ज दाखल केले होते.
यावेळी झालेल्या मतदानामध्ये सौ. संध्या महादेव कांबळे यांना 8 मते तर विनोद राठोड यांना 6 मते मिळाली. या उपसरपंच निवडणुकीत सौ. संध्या महादेव कांबळे यांच्या गळ्यात वावेघर ग्रामपंचायतीच्या पहिली महिला उपसरपंच पदाची माळ पडली. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात आनंद व्यक्त करत फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला. तसेच आमदार महेश बालदी यांनी ग्रामपंचायत वावेघर कार्यालय येथे सदिच्छा भेट देऊन उपसरपंच सौ. संध्या महादेव कांबळे व इतर सदस्य सरपंच आणि कर्यकर्ते यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment