सिटी बेल लाइव्ह । उरण । प्रतिनिधी ।
जागतिक महिला दिन निमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मा. पदाधिकारी श्री. शरद गोरे, श्री. राजकुमार काळभोर, डॉ. अ. ना. रसनकुटे, मुंबई प्रदेशाध्यक्षा राजश्री बोहरा- स्पर्धा मुख्य आयोजिका, परीक्षिका तसेच सह आयोजक अनिता गुजर, प्रणाली म्हात्रे, दीपा वनकुंद्रे, शबाना मुल्ला, दीपक नागरे यांच्या विद्यमाने- सलाड डेकोरेशन, सुगरण, छंद माझा वेगळा, गीत गायन (सूर निरागस हो) आणि अभिनय व नृत्य अशा अनेकविध आंतरराष्ट्रीय (जागतिक) स्तरावर ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या.

सदर स्पर्धांमध्ये भारताच्या विविध राज्यांतून तसेच देश-विदेशातून महिला-पुरुष, छोट्या-मोठ्या अशा एकूण ६५२ स्पर्धकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांपैकी गीत गायन- सूर निरागस हो. स्पर्धेमध्ये श्री. अरुण द. म्हात्रे यांच्यासह एकूण १४० स्पर्धकांनी भाग घेतला होता. या आंतरराष्ट्रीय (जागतिक) गीत-गायन स्पर्धेत रायगड जिल्हा, नवी मुंबईचे कवी/ गायक- श्री. अरुण दत्ताराम म्हात्रे. यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.








Be First to Comment