सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत महिला कर्मचाऱ्यांची काळजी म्हणून कर्जत नगरपरिषदे मधील महिला कर्मचाऱ्यांना सन जॅकेट चे वितरण करण्यात आले.
Q 8 सिस्टीम या संस्थे मधील किरण गायकवाड व दक्षा गायकवाड यांनी नगरपरिषद मधील महिला कर्मचाऱ्यांसाठी सन जॅकेट नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्याकडे सुपूर्द केली.
नगरपरिषद मध्ये छोटेखानी कार्यक्रमात नगराध्यक्षा सुवर्णा जोशी,बांधकाम सभापती स्वामिनी मांजरे, महिला व बालकल्याण सभापती संचिता पाटील, उपसभापती प्राची डेरवणकर, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती वैशाली मोरे, नगरसेविका पुष्पा दगडे, मधुरा चंदन, सुवर्णा निलधे उपस्थित होत्या.


नगरपरिषद मधील महिला कर्मचारी, सी एफ सी मधील महिला कर्मचारी आणि सफाई महिला कर्मचारी अश्या सुमारे 16 महिलांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सन जॅकेट वितरण करण्यात आले.सूत्रसंचालन रविंद्र लाड यांनी केले.








Be First to Comment