Press "Enter" to skip to content

धक्कादायक : २ महिन्याच्या मितालीचे अपहरण

नवघर येथून पोलिओ डोस पाजण्याच्या बहाण्याने दोन महिन्याची मुलगी पळविली

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू / अजय शिवकर

उरण तालुक्यातील नवघर गावातील मिताली मनोज राजभर या अवघ्या २ महिन्याच्या बालिकेचे कोणी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून पसार झाले आहेत. मितालीचा शोध सुरू आहे. तरी पालकांनी आपल्या लहान बाळाची काळजी घ्यावी. अज्ञात व्यक्तींनी डोस पाजण्याचे कारण सांगुन सदर बाळास तिच्या आईजवळुन घेतले.

सदर राजभर कुटुंब नवघर गावात आपल्या दोन मुलींसह नवघर गावात राहत होते ,मनोज सकाळी काही कामा निमित्ताने बाहेर गेले असताना त्यांची पत्नी साधना आपल्या मोठ्या मुलीला शेजारी खेळायला सोडून दोन महिन्याच्या छोट्या मुली सोबत घरी होत्या , त्याच वेळी चाॕकलेटी रंगाच्या ड्रेस वाली व काळा मास्क लावलेली एक अनोळखी बाई येऊन आम्ही वैद्यकीय अधिकारी आहोत असे सांगू लागली,आम्ही १५ दिवसांपूर्वी डोस दिला हे सांगूनही हा कोरोणा कालावधीतील खास डोस सांगून चलण्यास सांगितले तसेच कार्ड बघून तुमची ही दुसरी मुलगी आहे व पहिलीला सुद्धा घेऊन चला असे सांगितले .

मुलीच्या आईने विश्वासाने तिच्या हातात मुलीला देऊन शेजारी मोठ्या मुलीला आणायला गेली ,हीच संधी साधून मी रिक्षा बाजूला लावते सांगून ती बाई व रिक्षावाला सदर दोन महिन्याच्या मुलीला रिक्षातून घेऊन पसार झाले.

अज्ञात पुरूषाचे वय अंदाजे ३५वर्ष, रंग सावळा, महिलाने चॉकलेटी रंगाची साडी काळ्या रंगाचा स्काप बांधलेला आहे. बाळाचे वर्णन – २ महिन्याची मुलगी, नारंगी रंगाचा टी-शर्ट, गुलाबी रंगाची हाफ पॅन्ट घातलेली आहे.

याबाबत उरण पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पुढील तपास सुरू आहे. सदर वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळल्यास त्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्याला कळविण्याचे आवाहन केले जात आहे.

झालेल्या प्रकाराने घाबरलेल्या राजभर दाम्पत्याने उरण पोलिस स्टेशन कडे धाव घेतली. या बाबत पोलिस अधिक तपास करत आहेत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.