माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या प्रयत्नातून चांभार्ली येथील खोलंबलेल्या रत्याच्या कामाचे भुमिपुजन !
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
वासांबे जिल्हा परिषद विभागात संदिप मुंढे यांच्या प्रयत्नशील नेतृत्वाखाली वासांबे जिल्हा परिषद सदस्या उमाताई मुंढे यांचाकडून विकास कामांचा धुमधडाका सुरुच असून जिल्हा परिषद गटात नागरिकांनकडून माजी सरपंच संदिप मुंढे व जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती उमाताई मुंढे हे दोघे पती-पत्नी रसायनी विभागात कौतुकास्पद काम करीत असल्याचे बोलले जात आहे.
वासांबे जिल्हापरिषद विभागातील अनेक ठिकाणी रस्ते हायमास्ट,गटारे तसेच विविध विकासकामे माजी सरपंच संदिप मुंढे व जिल्हा परिषद सदस्या उमाताई मुंढे यांच्याकडून होताना नागरिकांना पहावयास मिळत आहेत. तर वाढदिवसा निमित्ताने महिला मंडळाना सक्षम बनविण्यासाठी शिलाई मशिन तसेच मंडळाना उपयुक्त असणाऱ्या साधन सामुग्री असे अनोखे उपक्रम हाती घेऊन यशस्वीरित्या वाटचाल करत असताना विकास कामांची कास धरत विकास कामांचा धुमधडाका सातत्याने वासांने जिल्हा परिषद विभागात होताना नागरिक मतदार वर्ग पाहत आहे.
दरम्यान चांभार्ली येथील शिवमंदिराकडे जाणा-या रस्त्याचे काम अनेक वर्षे रखडल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.चांभार्ली राजिप मराठी शाळा ते शिवमंदिर या ३०० मिटर रस्त्याची अतिशय बिकट अवस्था होती. शाळकरी विद्यार्थ्यांना खुपच त्रास होत असे.ही समस्या नागरिकांनी माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे यांना सांगितली होती.
माजी सरपंच संदिप मुंढे यांनी नागरिकांची समस्या जाणून घेतली. जिल्हा परिषद सदस्या उमाताई मुढे यांच्या मार्फत जिल्हापरिषदेत पटलावर ठेऊन मंजूर करून घेण्यात पाठपुरावा करून तडीस घेऊन जात सोडवीली.
या कामाचे भुमिपुजन सोमवार दि 15 रोजी दुपारी महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे यांच्याहस्ते करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

राजिप मराठी शाळा हा रस्ता तीनशे मीटर लांबीचा असून त्याचे काम माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या प्रयत्नातून भुमिपुजन करूत रस्त्याच्या कामास सुरूवात झालेली आहे.
राजिप मराठी शाळा ते शिव मंदिर या रस्त्याचे भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी माजी सरपंच संदिप मुंढे ,हभप बाळाराम महाराज पाटील,राजिप माजी. महिला बालकल्याण सभापती उमाताई मुंढे,राजश्री जांभळे,सरपंच बाळी कातकरी,दत्ता जांभळे,उपसरपंच प्रतिप पाटील,ग्रामसेवक कांबळे,माजी उपसरपंच उमेश मुंढे,तुळसीदास पाटील, जगनाथ पाटील,पंढरीनाथ पाटील, सीताराम मुंढे,तुकाराम मुंढे, रघुनाथ पाटील,किसन मुंढे,हनुमंत पाटील, देविदास म्हात्रे,विनायक डवले,संतोष पाटील,भास्कर म्हात्रे,पांडुरंग काळे, धनाजी जांभळे,विनायक गायकवाड, अक्षय पाटील आदी उपस्थित होते.
हा रस्ता दर्जेदार पेव्हर ब्लाॕकचा असून खडी ग्रीट सोलिंग करून रोडरोलरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे दर्जेदार बनणार असून रस्त्याचे काम सुरू झाले आहे.चांभार्ली राजिप मराठी शाळा ते शिवमंदिर रस्त्याचे काम सुरू झाल्याने चांभार्ली येथिल नागरिकांनी माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे यांचे आभार मानले.








Be First to Comment