सोमवती अमावस्येला नव्याने तेरा कोरोनाबाधित : एकूण रुग्ण संख्या 170
सिटी बेल लाइव्ह / रसायनी / राकेश खराडे #
कोरोना (कोविड-19)या विषाणूने जगभर थैमान घातल्याने सर्वंत्र हाहाकार माजला आहे.महाराष्ट्र राज्यातही कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच आहे. कोरोना या विषाणुची सर्वंत्र भिती असली तरी नागरिक गंभीर दखल घेताना दिसत नसल्यानेच कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येते. रसायनी परीसरातील वासांबे मोहोपाडा परीसरात कोरोनाने शिरकाव करुन भयभीत वातावरण निर्माण झाले आहे.
वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोनाचा फैलावर वाढून मंगळवारी नव्याने नऊ जणांचे कोरोना अहवाल पाॅजिटीव्ह आले असून वासांबे मोहोपाडा हद्दीत एकूण 170 व्यक्ती कोरोनाने बाधित झाले आहेत.सोमवारपर्यंत मोहोपाडा चार. यात तेरा वर्षीय मुलगा,ऐंशी वर्षीय महिला,चौतीस वर्षीय पुरुष,साठ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.तर नवीन पोसरीतील चार जणांचे अहवाल पाॅजिटीव्ह आले आहेत ,यात दोन महिला दोन पुरुषांना कोरोनाची लागण आहे,साठ व सव्वीस वर्षीय महिला, पंचेचाळीस व बत्तीस वर्षीय पुरुष आहेत. रिसमध्ये एकोणतीस वर्षीय पुरुष,भटवाडी छत्तीस वर्षीय पुरुष,कांबे दोन व्यक्तींचे अहवाल पाॅजिटीव्ह आले आहेत.यात चालीस व सव्वीस वर्षीय पुरुष,खाने आंबिवळी एकात्तर वर्षीय महिला असे एकूण वासांबे मोहोपाडा हद्दीत सोमवारी तेरा जणांना कोरोना अहवाल पाॅजिटीव्ह आले असून एकूण आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णसंख्या 170 झाली असून 105 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 65 जणांवर उपचार सुरू आहेत.
रसायनीत कोविड सेटंर उभारण्याची गरज निर्मांण झाली आहे.परंतु शासनाकडून व्यवस्थित लक्ष दिले जात नसल्याचे नागरिक सांगत आहेत.नागरिकांनी सोशल डिस्टींगशनचे पालन करुन आपली स्व:ताची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन होत आहे.रसायनीकरांनो आतातरी सावध व्हा! विनाकारण घराबाहेर पडणे टाला,सोशल डिस्टसिंगचे तंतोतंत पालन करा असे आवाहन पुन्हा पुन्हा करण्यात येत आहे.






Be First to Comment