Press "Enter" to skip to content

उरण सामाजीक संस्थेचे प्रयत्न तर उरण आरोग्य विभागाची साथ

22आदिवासी वाड्यांवरील महीलांची होणार कुटूंब नियोजन शस्रक्रिया, पहील्या टप्प्यातील महीलांची आरोग्य तपासणी पूर्ण

सिटी बेल लाइव्ह । उरण । पृथ्वीराज कडू ।

कोप्रोली ग्रामिण आरोग्य केंद्रावर टप्प्या टप्प्याने उरणमधील 22 आदिवासी वाड्यांवरील 100 च्यावर आदिवाशी महीलांची कुटूंब नियोजनाची शस्रक्रीया करण्यात येणार आहे.त्याच्या पहील्या टप्प्यातील 10 महीलांची आरोग्यतपासणी रोजी कोप्रोली ग्रामीण आरोग्य केंद्रावर पार पडली.

या साठी उरण सामाजीक संस्थेचे प्रा.राजेंद्र मढवी,संतोष पवार व कार्यकर्त्यांनी प्रत्येक आदिवासी वाडीवर जावून प्रबोधन केल होत . आदिवाशी बांधवांकडे कोणतीही कागदपत्रे नसल्या कारणाने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता.त्यामूळे उरण सामाजीक संस्थेमार्फत उरण मधील 22 आदिवाशी वाड्यांवरील नागरीकांसाठी गेले काही महीने,रेशन कार्ड,आधार कार्ड,जातीचे दाखले,आशा प्रकारची कागदपत्रे काढण्याची कामे चालू होती.ति कामे आता पूर्णत्वास आली आहेत.

परंतू ही कामे करत असताना उरण सामाजीक संस्थेच्या असे लक्षात आले,की हे लोक कुटूंब नियोजन करत नसल्याने यांच्या मुलांची संख्या मोठी आहे.त्यामूळे त्यांची आर्थीक कोंडी होवून, त्यांच्या प्रगतीस अडथळा ठरत आहे.त्यामूळे,उरण तालुका आरोग्य आधीकारी,डाॅ.राजेंद्र ईटकरे व कोप्रोली ग्रामीण आरोग्य केंद्राचे डाॅ.चोरमूळे व डाॅ. राजाराम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, उरण सामाजीक संस्थेचे प्रा.राजेंद्र मढवी, संतोष पवार व काही कार्यकर्ते या 22 आदीवाशी वाड्यांवर जावून त्यांचे कुटूंब नियोजना बाबत गैरसमज दूर करून त्यांचे प्रबोधन केले.

त्यामूळे आता टप्प्या टप्प्याने या 22आदिवासी वाड्यांवरील 100 च्या वर महीलांची कुटूंबनियोजनाची शस्रक्रिया कोप्रोली ग्रामीण आरोग्य केंद्रावर होणार आहे.त्यातील पहील्या 10 महीलांच्या आरोग्याची तपासणी,कोप्रोली ग्रामीण आरोग्य केंद्रावर दि.11 रोजी पूर्ण झाली.

आदिवासी बांधवांना शासकीय योजना मिळण्यासाठी त्यांना विवीध दाखले मिळवून देण्याचे काम करत असताना,हे बांधव कुटूंब नियोजन करण्यास काही गैरसमजातून टाळाटाळ करतात.त्यामूळे या वाड्यांवर जावून उरण तालुका आरोग्य आधीकारी,डाॅ.राजेंद्र ईटकरे व कोप्रोली ग्रामीण आरोग्य केंद्राचे डाॅ.चोरमूळे व डाॅ. राजाराम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांचे प्रबोधन केल.

प्राध्यापक राजेंद्र मढवी उरण सामाजीक संस्था

उरण सामाजीक संस्था व प्राध्यापक राजेंद्र मढवी यांनी आदिवासी बांधवांमध्ये कुटूंब नियोजन शस्त्रक्रीये बाबत जनजागृती केली.त्यातून 100 महीला तयार झाल्या आहेत,त्यांना प्रवासासाठी सोयीच पडाव आस मध्यवर्ती ठिकाण म्हणून कोप्रोली ग्रामीण आरोग्य केंद्रात शस्रक्रीया करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.त्यासाठी माझे सहकारी डाॅ.चोरमूळे व डाॅ. राजाराम भोसले हे मदत करणार आहेत.

डाॅ.राजेंद्र इटकरे
तालुका आरोग्य आधीकारी उरण




उरण मधील अनेक वाड्या या दूर्गम आहेत.तेथे प्रवास करणेही जीकरीचे आहे.त्यामूळे मुख्य प्रवाहापासून ते दूर आहेत.तर त्यांचे जीवनचक्र रोजंदारीवर आवलंबून आहे.तसेच शिक्षणाचा अभाव ही एक येथील मोठी समस्या आहे.त्याचबरोबर येथील आदिवाशी बांधवांमध्ये पसरलेली आंधश्रद्घा,त्यामूळे इतर वैद्यकीय उपचाराबरोबरच कुटूंब नियोजन शस्त्रक्रीये बाबत त्यांच्या अनेक गैरसमजूती आहेत.त्यामूळे त्यांच प्रबोधन करणे गरजेच होत.त्यासाठी उरण सामाजीक संस्थेच्या प्राध्यापक राजेंद्र मढवी यांनी गेले अनेक दिवस खूप मेहनत घेतली.खर म्हणजे ही शस्त्रक्रीया महीला व पुरुष या दोघांची ही करता येते.परंतू या शस्त्रक्रियेसाठी आदीवासी समाजातील महीलांनी पुढाकार घेतला आहे हे विषेश

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.