अल्पसंख्याक सेलच्या उरण तालुका उपाध्यक्षपदी पोली फर्नांडिस व यासीम पटेल
सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेऊन आज रविवार दिनांक 14 मार्च 2021 रोजी उरण शहरातील व परिसरातील शेकडो मुस्लिम व ख्रिश्चन कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला. अल्पसंख्याक सेलचे उरण तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक झहीर कुरेशी व चाणजे माजी ग्रामपंचायत सदस्य गिल्बर्ट डिसोझा यांच्या प्रयत्नाने हा प्रवेश सोहळा पार पडला.


प्रवेश करण्यामध्ये मोरेश फर्नांडिस, फेडी फर्नांडिस, व्हिक्टोरिया फर्नांडिस, थाॅमस चिरायत, विवियन फर्नांडिस, हिलरी मिरांडा, विद्या सबनीस, सुरेखा गावीत, मोमन बेग, सलाम केळकर, अब्दुल अजीज बेग, जलील हमदुले, युनस खान, पी. एस. राठोड, अबू बकर तुंगेकर, अमीर चाँद शेख, मोहम्मद भाई, जावेद काजी, फरहान शेख, कमरुद्दीन शेख, तिहाम कुरेशी, मुस्तफा सय्यद, रझाक शेख, फातिमा शेख,विवियन फर्नांडिस, हिलरी मिरांडा, विद्या सबनीस, सुरेखा गावीत, मोमन बेग, सलाम केळकर, अब्दुल अजीज बेग, जलील हमदुले, युनस खान, पी. एस. राठोड, अबू बकर तुंगेकर, अमीर चाँद शेख, मोहम्मद भाई, जावेद काजी, फरहान शेख, कमरुद्दीन शेख, तिहाम कुरेशी, मुस्तफा सय्यद, रझाक शेख, फातिमा शेख,पाॅली फर्नांडिस, यासीन पटेल, यांनी आपल्या परिवारासह शिवसेनेत प्रवेश केला.
या सर्वाचा शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर व शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांनी शिवसेनेत स्वागत केले. यावेळी अल्पसंख्याक सेलच्या उरण तालुका उपाध्यक्षपदी पोली फर्नांडिस व यासीम पटेल यांची नियुक्ती करण्यात आली.
सदर पक्ष प्रवेशाच्या वेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, गटनेते गणेश शिंदे व उरण शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे व मुस्लिम कार्यकर्ते सय्यद मुस्तफा यांनी मार्गदर्शन केले.

सदर प्रसंगी अल्पसंख्याक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, अवजड वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष चेतन म्हात्रे, नगरसेवक समीर मुकरी, शहर संघटक दिलीप राहाळकर, नवीन शेवा माजी अध्यक्ष जगजीवन भोईर, शिक्षक सेनेचे महेश गावंड व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment