महिलांचा रक्तदानासाठी पुढाकार
श्रीनिवास काजरेकर
खांदा कॉलनी दि. १४ः
भारत विकास परिषदेच्या वतीने खांदा कॉलनीमधे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. खांदा कॉलनीतील रोटरी क्लब, नवीन पनवेलच्या रक्तपेढीमधे हे शिबीर संपन्न झाले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे यामधे महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन रक्तदान केले.
सध्या केव्हिडच्या संकटामुळे सर्वत्र रक्ताची मोठ्या प्रमाणावर आवश्यक्तता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत विकास परिषदेने सभासदाना रक्तदानासाठी आवाहन केले. महिलादिनाचे औचित्य साधत महिलांनीही रक्तदान करण्यात पुढाकार घेतला.
यावेळी रोटरी क्लबच्या सभागृहात परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. त्यामधे पनवेलच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. गिरीश समुद्र अध्यक्ष, नितीन कानिटकर सचीव व शेखर बर्वे यांची खजिनदार म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
अॅनामियामुक्त भारत अभियान जोमाने
भारत विकास परिषदेच्या वतीने “अॅनामियामुक्त भारत” हे अभियान जोमाने संपन्न होत आहे. ८ नोव्हेंबर रोजी ४५ महिलांची हिमोग्लोबीन चाचणी करण्यात आली. त्यातील २२ महिलानी रक्तदान केले होते. त्यानंतर महिलादिनाचे ओचित्य साधून महिलांनी पुढाकार घेवून रक्तदान करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याची पूर्तता आज केली आहे.डॉ. कीर्ती समुद्र
भारत विकास परिषद, पनवेल.








Be First to Comment