Press "Enter" to skip to content

उरणच्या पिरवाड समुद्रकिनारी साफसफाई

सेव अवर बिच संस्थेचे उरणच्या पिरवाडी समुद्र किनार्‍यावर स्वच्छता अभियान

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।

सेव अवर बिच ही संस्था गेली 3 वर्षे उरणच्या पिरवाडी समुद्र किनार्‍यावर स्वच्छता अभियान राबवित असते परंतु यावेळी कोरोनाच जागतिक संकट असल्या कारणाने लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते त्यामुळे यावर्षी स्वच्छता अभियान राबविता आले नव्हते त्यामुळे समुद्र किनार्‍यावर घाणीचे साम्राज्य पसरले होते.

सदर परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली होती.हा परिसर स्वच्छ सुदंर व्हावा, कचऱ्यामुळे कोणती रोगराई पसरू नये या दृष्टीकोणातून सेव अवर बीच, श्री छत्रपती सामाजिक संस्था कोप्रोली,नवपरिवर्तन संस्था, खुशिया फॉउंडेशन(मुंबई )या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमानातून पिरवाडी समुद्र किनारी स्वछता अभियान राबविण्यात आले.

सेव अवर बिचच्या या संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या स्वच्छता अभियानास विविध सामाजिक संस्था तसेच नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या स्वच्छता अभियानात प्रमुख उपस्थिती म्हणुन मुंबई येथील खुशींया फाऊंडेशन अणि लिमका बुक रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त बीच वॉरियर्स या संस्थेचे संस्थापक चिनु क्वात्रा अणि त्यांची टीम उपस्थित होती.

सेव अवर बीच या संस्थेच्या वतीने भूमिका सिंग, हर्षल धायफुले, आर्यन घरत, अमोल दुरुगकर, स्वाती दुरुगकर, स्मिता नाखवा, समाजसेवक संतोष पवार, मुंबईस्थित खुशींया फाऊंडेशन अणि बीच वारीयर्स या संस्थेचे संस्थापक चिनु क्वात्रा अणि त्यांची टीम, नवपरिवर्तन या संस्थेकडून शेखर म्हात्रे, हर्षल ठाकुर, रमेश म्हात्रे, इतजार ठाकुर, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष सुदेश पाटील, उपाध्यक्ष-पत्रकार विठ्ठल ममताबादे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. विघ्नेन इंटरप्रायजेसचे अनिकेत ससे यांनी सर्वांसाठी नाष्टापाण्याची सोय करुन हातभार लावला.

साफसफाई करून जमा झालेला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच कचरा साफ करताना अनेक सिगारेटची पाकिटे, 100 हुन जास्त दारूच्या बाटल्या जमा झाल्या होत्या त्याचीही विल्हेवाट लावण्यात आली. साफसफाई नंतर समुद्रकिनारा साफ व सुंदर झाला. पिरवाडी समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांनी सदर कामाचे कौतुक केले.उरण मधील विविध सामाजिक संस्थेकडून सदर कामाचे कौतुक होत असून या स्वच्छता अभियानामुळे शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाला हातभार लागला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.