खांब देवकान्हे धामणसई विभागाच्या अध्यक्षपदी श्याम लोखंडे व सरचिटणीसपदी सुरेश जंगम यांची निवड
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
ओबीसी समाजाच्या न्यायी हक्कांसाठी लढणाऱ्या ओबीसी संघर्ष समन्वय समिती संलग्न ओबीसी जन मोर्चा या संघटनेच्या खांब देवकान्हे धामणसई विभागाची सभा समाजनेते स्व.मा.आ.पा. रा.सानप कुणबी भवन रोहा येथे ओबीसी समाजनेते शंकरराव म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सुरेश मगर यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष अनंत थिटे, समाजनेते रामचंद्र चितळकर, महेंद्र पोटफोडे, मारुती,खेळू ढमाल,प्रकाश थिटे,राम मरवडे, व तालुका सरचिटणीस महादेव सरसंबे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साह वातावरणात पार पडली.
सदरच्या आयोजित सभेत यांचे सर्वानुमते खांब देवकान्हे धामणसई विभागातुन पत्रकार डॉ श्याम लोखंडे यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर सरचिटणीस पदी रा. ग.पोटफोडे विद्यालयाचे प्राचार्य सुरेश जंगम यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष म्हणून गजानन गायकर,भरत कान्हेकर,रघुनाथ कोस्तेकर,सोपान मोहीते यांची नियुक्ती करत चिटणीस पदी सुधीर बारस्कर, पांडुरंग गोसावी,गंगाराम कोकले,यांची निवड करण्यात आली तसेच खजिनदार म्हणून रामशेठ कापसे यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली .
या बैठकीस ओबीसी समाजनेते शंकरराव म्हसकर, रोहा तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश मगर उपाध्यक्ष अनंत थिटे,रामचंद्र चितळकर, महेंद्रशेठ पोटफोडे,खेळू ढमाल,प्रकाश थिटे, राम मरवडे,वसंत मरवडे,धनाजी लोखंडे,अशोक जंगम,ज्ञानेश्वर भोईर,संतोष भोईर, विश्वनाथ धामणसे,विजय पवार,विलास पवार,दिलीप मोहिते, शंकर कदम,नामदेव धोत्रे,शिवाजी मुटके,महेश तुपकर,सतीश ठाकूर,गोपाळ खरीवले,अनिल आयरे,विलास थिटे,आदि ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत ओबीसी समाजाच्या न्यायी हक्कांसाठी लढणाऱ्या ओबीसी संघर्ष समन्वय समिती ची माहिती, ध्येय धोरणे, ओबीसी समाजाच्या विविध प्रश्न,शासन दरबारी पाठपुरावा या बाबतीत मार्गदर्शन ओबीसी समाज नेते शंकरराव म्हसकर तालुकाध्यक्ष सुरेश मगर,सरचिटणीस महादेव सरसंबे रामचंद्र चितळकर,अनंत थिटे यांनी केले.
उत्स्फुर्त प्रतिसाद लाभलेल्या खांब देवकान्हे धामणसई विभाग ओबीसी संघर्ष समन्वय समीचीच्या आयोजित सभेत समाजनेते रामचंद्र चितळकर, महेंद्रशेठ पोटफोडे,खेळू ढमाल,प्रकाश थिटे,राम मरवडे,वसंत मरवडे,अशोक जंगम,धनाजी लोखंडे ,यांची यावेळी सभागृहाच्या वतीने सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली व सदस्यांची देखील यावेळी नेमणूक करण्यात आली,
पांडुरंग गोसावी, खेळू ढमाल ,शंकर कदम,धनाजी लोखंडे , यांनी ओबीसी समाजाने संघटीत होण्याची गरज असल्याचे सांगितले.या बैठकीत कार्यकारिणी निवडीनंतर सर्व समाज बारा बलुतेदार अलुतेदार एकत्रितपणे येऊन एकसंघटीत राहून आपली जातीनिहाय जनगणना सरकारने केलीच पाहिजे अशी प्रामुख्याने मागणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले शेवटी नवनिर्वाचित निवड झालेल्या मान्यवरांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देत खेळू ढमाल यांनी या सभेचे आभार व्यक्त केले आणि सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.








Be First to Comment