उपसरपंच मोहन लबडे यांच्या प्रयत्नांना यश
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
कोरोना व्हायरसने पुन्हा डोके वर काढल्याने शासन आपल्या परीने नागरीकांमध्ये जनजागृती करून अथक उपाययोजना करत आहे. तसेच नागरीकही आपापल्या परीने काळजी घेण्याचा प्रयत्न करुन कोरोनाशी चार हात दूर राहुन आपला जीव वाचवून प्रपंचाचा गाडा हाकत आहेत.
कोरोना महामारीच संकट हे मानगुटीवरच येऊन बसल आहे. कधी, कुठे, कसं, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगु न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.कोरोना पाश्र्वभूमीवर अजिवली पिआयसी विभागातील खानावले ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी कोविशिल्ड लस उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मोहन बालाराम लबडे यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने खानावले ही कोविशिल्ड लसीकरणासाठी पहिली ग्रामपंचायत ठरली.

यावेळी कोविशिल्ड व्हॅकसीनचा पहिला डोस उपसरपंच मोहन बालाराम लबडे यांनी घेवून परीसरातील नागरिकांना कोविशिल्ड लस घेण्याबद्दल आवाहन केले आहे.यावेली मोहन बालाराम लबडे यांनी नागरिकांना कोरोनाविरुध्दच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रत्येकाच्या कोविशिल्ड लस घ्यावी, सोशल डिस्टिंक्शनचे पालन करुन मास्क लावावा तसेच वेळोवेळी सॅनिटायझर वापरावा असे आवाहन उपसरपंच मोहन लबडे यांनी केले.








Be First to Comment