सरचिटणीस गणेश खरीवले, उपाध्यक्ष रविंद्र जाधव, संजय बिर्जे आदींची निवड
सिटी बेल लाइव्ह । मेढा । उदय मोरे ।
ओबीसीच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या ओबीसी संघर्ष समन्वय समिती, सलग्न ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्राच्या रोहा तालुक्यातील भातसई, सानेगाव मेढा विभागाची कार्यकारणी निवडीची सभा भातसई येथील महादेवी मातेच्या मंदिरात शुक्रवारी पार पडली.
या कार्यकारणीच्या निवडीमध्ये भातसई विभागाच्या अध्यक्षपदी नंदकुमार म्हात्रे तर सरचिटणीसपदी गणेश खरीवले यांची निवड करण्यात आली. या सभेस रोहा तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समिती अध्यक्ष सुरेश मगर, उपाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, उत्तम नाईक, सरचिटणीस महादेव सरसंबे, तालुका कार्यकारणी सुहास खरीवले, प्रसिद्धी प्रमुख उदय मोरे, ओबीसी समाजातील संतोष दिवकर, सुभाष खरीवले, जयवंत खरीवले, अनिल भोई, नथुराम महाले आदी उपस्थित होते.

यावेळी उपाध्यक्ष रविंद्र जाधव, गणेश मढवी, संजय बिर्जे, दिलीप म्हात्रे, खजिनदारपदी अनंत चोलकर, मोरेश्वर खरीवले, मोहन ठाकूर, मोतीराम गिजे, प्रदीप सर्नेकर, सल्लागार चंद्रकांत मळेकर, लक्ष्मण महाले, हरिश्चंद्र खरीवले, गजानन खांडेकर, रघुनाथ करंजे गुरुजी, कार्यकारणी सदस्य निकेश पोकळे, नवनीत डोलकर, आत्मराम घरट, तुषार खरीवले, भगवान मोहिते, सुरेश खांडेकर, हनुमान कोतवाल, सदानंद शेळके, महेंद्र शिंदे, हरेश म्हात्रे, हेमंत ठाकूर, राम गिजे, दत्तराम चावरेकर, यांची निवड करण्यात आली.
दरम्यान सुरेश मगर यांनी ओबीसी समाजाच्या न्यायी हक्कासाठी आपण सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे सांगितले.








Be First to Comment