महिलादिनी सासवांनी केला सुनांचा सन्मान
सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
प्रसिद्ध साहित्यिका व समाजसेविका उषाताई कांबळे यांनी आनंदी सांज कट्टयावर आयोजित केलेल्या महिला दिनाचे औचित्य साधून कट्टयावरील सूनांचा सासवांच्या हस्ते यथोचित सत्कार करून एक वेगळ्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या आयोजक तथा प्रसिद्ध साहित्यिका व समाजसेविका उषा कांबळे यांनी तसेच अन्य सहकारी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी सोनाली कांबळे,प्रतिभा गोरखेडे,पूजा ढोले,अंजली जावडेकर,मेघा जावडेकर,कल्पना विळेकर,सुषमा चिंचोरे,आशा वैशंपायन,स्वाती वेशंपायन,सुनंदा रेळेकर,सुवर्णा रेळेकर,प्रियांका गोरखेडे,उषा पळशीकर,कल्पना ठाकूर आदी सासू-सुनांनी महत्वपूर्ण उपस्थिती नोंदवून कार्यक्रमात सहभाग दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

यावेळी उपस्थित सासवांनी आपल्या सुनांचा यथोचित सन्मान करून एका वेगळ्या पद्धतीने महिलादिन साजरा केला.दरम्यान साहित्यिका उषा कांबळे आणि अन्य आयोजकांनी संपन्न केलेल्या या आगळ्या वेगळ्या महिला दिनाचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.








Be First to Comment