सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहा । नंदकुमार मरवडे ।
रा.जि.मध्यवर्ती सह.बँक अलिबाग कोलाड शाखेतर्फे पुई येथे आर्थिक साक्षरता शिबीर यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला.
राष्ट्रीय क्रुषी ग्रामीण विकास बँक नाबार्ड यांच्या आणि.रा.जि.मध्यवर्ती सह.बँक अलिबाग कोलाड शाखेच्या वतीने पुई येथे संपन्न झालेल्या आर्थिक साक्षरता शिबिर प्रसंगी कोलाड शाखाधिकारी सौ.सरफले यांनी महिला वर्गाने स्वकर्तुत्वावर स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय निर्माण करून उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करावे तर बचत गटातील महिलांनी देखील सक्रीय होऊन छोट्या व्यवसायापासून प्रारंभ करून आपापला उदरनिर्वाह करावा तर
राष्ट्रीय क्रुषी ग्रामीण विकास बँक नाबार्ड व रा.जि.मध्यवर्ती सह.बँक अलिबाग कोलाड शाखा यांच्या सहकार्याने आपण व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून दिले जाईल असे सांगतानाच तर महिला सक्षमीकरणासाठी शासनाकडून राबविले जात असलेल्य उपक्रमांचा वेळोवेळी फायदा करून घ्यावा अशाप्रकारचे अवाहन शेवटी त्यांनी केले.
या साक्षरता शिबिर प्रसंगी कोलाड शाखेचे सर्व कर्मचारी व्रुंद व पुई येथील विविध महिला बचत गटाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांनी उपस्थिती नोंदविली होती.तर कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर शासनस्तरावरील सर्व नियमांचे पालन करुन सदर मेळावा यशस्वीपणे संपन्न करण्यात आला.








Be First to Comment