Press "Enter" to skip to content

वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्ड लसीकरणास सुरूवात

ज्येष्ठ नागरिकांचा उस्फ़ुर्त प्रतिसाद

सिटी बेल लाइव्ह । खोपोली । संतोषी म्हात्रे ।

खालापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्साहवर्धक वातावरणात कोविशिल्ड लसीकरणास प्रारंभ झाले आहे.वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवार दि.१२ मार्च रोजी शुभारंभ करण्यात आले आहे.लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा उस्फ़ुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल खालापूर तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद रोकडे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी कोविशिल्ड लसीकरणाल सुरूवात करण्यात आली असून वनवठे येेेेथील चिंतामण कदम आणि अंजली कदम या दाम्पत्यांनी पहिली लस घेतली आहे.

याप्रसंगी खालापूर तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद रोकडे,डॉ. सीमा पाईकराव,डॉ.शिंदे,गोरठणचे मा.उपसरपंच राकेश जाधव यांच्यासह कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक महिला उपस्थित होत्या.

      खालापूर तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचारी आणि पोलिस अधिकाऱ्यांंना कर्जत येथील उपजिल्हा रूग्णालयात जावे लागत होते.आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे कोविशिल्ड लस उपलब्ध झाली आहे.परंतु लसी बाबत ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात किंतु परंतु असल्यामुळे लस घेतील की नाही असा संशय होता मात्र ज्येष्ठ नागरिक केलेली गर्दी पाहता समाधान वाटले असल्याची माहिती वावोशी केंद्राच्या डॉ. सीमा पाईकराव यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.