सिटी बेल लाइव्ह । उरण । प्रतिनिधी ।
उरण शहरातील वीर सावरकर मैदानावरील नगपालिकेचे अर्धवट असलेले बांधकाम हे जुगाराचा अड्डा बनलाय आहे. सकाळ पासून रात्री पर्यंत हा जुगाराचा अड्डा सुरू असतो. या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे माणसांवर निर्बंध आहेत. परंतु उरणमध्ये नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. शहरातील वीर सावरकर मैदानावर नगरपालिकेचे काही कारणाने गेली अनेक वर्षांपासून बांधकाम अर्धवट अवस्थेत पडलेले आहे. मात्र या अर्धवट बांधकाम असलेल्या इमारत मात्र आता जुगाऱ्यानी ताब्यात घेतली असून नेहमी सकाळ पासून रात्री पर्यंत जुगाराचा अड्डा सुरू असतो.
जुगार खेळणारे हे देशी गावठी दारुसह इतर नशिली पदार्थांचे सेवन करून बाटल्या तिथेच टाकून देत असल्याचे चित्र पहावयास मिळते. नशेमध्ये अनेकवेळा हाणामारीसुद्धा होत असतात. एखादी मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोणाला धरणार असा सवाल उपस्थित होत आहे. याचा त्रास मैदानावर खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंच्या पायांना दारूच्या बाटल्यांच्या काचा पायांना लागत आहेत. तसेच शेजारील इमारतीमधील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे तेथील नागरिक सांगतात.
तरी वीर सावरकर मैदानावर सुरू असलेलला जुगाराचा अड्डा पोलिसांनी कायम स्वरूपी बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.








Be First to Comment