Press "Enter" to skip to content

कोलाड येथील पत्रकार कल्पेश पवार यांना युवा पुरस्कार जाहीर

मान्यवरांच्या हस्ते अलिबाग येथे होणार वितरण सोहळा

सिटी बेल लाइव्ह । खांब – रोहे । नंदकुमार मरवडे ।

कोलाड विभागांतील डॅशिंग तसेच आपल्या लेखणीतून परिचित असणारे तरुण पत्रकार कल्पेश बाबू पवार यांना रायगड प्रेस चा स्व.संतोष पवार स्मृती युवा पत्रकार पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार.दि.१४ मार्च रोजी अलिबाग येथे विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.

पत्रकार कल्पेश पवार यांचा स्वभाव अतिशय शांत संयमी असून ते कोलाड विभाग वार्ताहर म्हणून निर्भीड निपक्षपाती पत्रकारीता करत तरुण वयात आपल्या लेखणीतून अनेक आवाज उठवत आहेत.राजकीय पासून समाजातील सर्व घडामोडींचे ते बातमी संकलन करीत असून,क्राईम बातम्या मध्ये त्यांची विशेष छबी आहे.असे हे सामाजिक बांधिलकी जपणारे पत्रकार कल्पेश पवार यांना स्व.संतोष पवार स्मृती युवा पत्रकार पुरस्कार जाहीर झाला असून, हा पुरस्कार वितरण कार्यक्रम व रायगड प्रेसक्लब संघटनेच्या १५ वा वर्धापन सोहळा रविवार दि. १४ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता. आम्रवंन कार्लेखिंड अलिबाग येथे होणार आहे.

यावेळी कार्यक्रम अध्यक्ष एस एम देशमुख ( संस्थापक रायगड प्रेसक्लब मुख्य विश्वस्त मराठी पत्रकार) परिषद,ना.अदिती तटकरे (पालकमंत्री रायगड) आ.महेंद्र दळवी,दिलीप पांढरकामे (महा संचालक माहिती व जनसंपर्क महाराष्ट्र शासन,)प्रफुल्ल मारपकवार( सह संपादक टाईम्स ऑफ इंडिया,)किरण नाईक ( विश्वस्त मराठी पत्रकार परिषद,) मनोज सानप (जिल्हा माहिती अधिकारी रायगड) दिलीप रानवडे ( कामगार नेते शिवसेना ) विजय मोकल ( कोकण विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषद ) नागेश कुलकर्णी उपाध्यक्ष रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ ) आदी मान्यवर उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमाची जय्यत तयारी रायगड प्रेसक्लब जिल्हा कमिटी च्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संयोजक अभय आपटे,मानसी चेऊलकर,मोहन जाधव,भारत रांजणकर,,संजय भुस्कुटे हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.