सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)
पनवेलला रूग्णसंख्या वाढत चालली असल्याने प्रयोगशाळेची नितांत गरज आहे. तरी अलिबाग येथे उभारण्यात येणारी जिल्ह्यातील एकमेव आयटीपिसीआर ही प्रयोगशाळा अलिबाग येथे न उभारता ती पनवेलमध्ये उभारल्यास रूग्णांच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने सोयीचे पडेल अशी मागणी शिवसेना पनवेल विधानसभा संघटक दिपक निकम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या परवानगीने कोरोनाची चाचणी करण्यासाठी आयटीपिसीआर ही प्रयोगशाळा उभारण्यास परवानगी मिळाली आहे. त्यासाठी 1 कोटी 7 लाख रूपये खर्च असून ही प्रयोगशाळा अलिबाग येथे उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून प्रयोगशाळा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती निधी आणि सिएसआर निधीतून खर्च केला जाणार आहे. परंतु रायगड जिल्ह्याच्या तुलनेने सर्वाधिक रूग्ण पनवेल तालुक्यात असल्याने सदर प्रयोगशाळेची आवश्यकता पनवेल तालुक्याला आहे. त्यामुळे शासनाने फेरविचार करून ही प्रयोगशाळा अलिबाग येथे न उभारता पनवेल येथे उभारावी अशी मागणी शिवसेना पनवेल विधानसभा संघटक दिपक निकम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. अलिबागला चाचणीचे नमुने घेऊन जाण्यासाठी सुमारे अडीच तासांचा कालावधी लागणार आहे. सध्या पनवेलमधील कोरोना आयटीपिसीआर चाचणी कामोठे येथील एमजीएम रूग्णालय या खाजगी रूग्णालयात केली जाते. रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पनवेलमध्ये ही प्रयोगशाळा होणे आवश्यक आहे. तरी याबाबत शासनाने विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेनापनवेल विधानसभा संघटक दिपक निकम यांनी केली आहे.






Be First to Comment