कोप्रोली ग्रामीण आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाला सुरूवात
By City Bell on March 11, 2021
सिटी बेल लाइव्ह । उरण । सुभाष कडू ।
ग्रामीण आरोग्य केंद्र कोप्रोली येथे कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.तालुका आरोग्य आधीकारी डाॅ.राजेंद्र इटकरे,कोप्रोली ग्रामीण आरोग्य केंद्राचे डाॅ.राजाराम भोसले, डाॅ.चोरमूळे, समाजसेवक संतोष पवार, प्राध्यापक राजेंद्र मढवी यांच्या उपस्थीतीत कोप्रोली येथील जेषाठ नागरीकाला लस देवून लसीकरणाची सुरुवात करण्यात आली.
राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसर्या ट्टप्याला सुरुवात झाली आहे.त्यामध्ये 45 वर्ष ते 60 वर्ष या दरम्यान ज्या नागरीकांना ब्लड शुगर,ब्लड प्रेशर,दमा, वा ईतर अजार आसतील तसेच 60 च्या वर सर्व नागरीकांना कोरोना लस देण्यात येणार आहे.त्यामूळे जास्त लसीकरण केंद्रांची गरज भासत आहे.त्या अनुषंगाने कोप्रोली ग्रामीण आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.
…..कसे होणार लसीकरण…..
प्रत्येक आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत दररोज 100 नागरीकांना लस देण्यात येणार आहे. 80 नागरीकांच आॅफलाईन तर 20 नागरीकांच आॅनलाईन रजीष्ट्रेशन करण्यात येणार आहे. सोबत आधारकार्ड व फोन नंबर आवश्यक आहे.
कोरोना लसीबाबत नागरीकांनी कोणतीही शंका मनात बाळगू नये.मी स्वत: दोन्ही डोस घेतले आहेत.तरी कोप्रोली ग्रामीण आरोग्य केंद्रात सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी येवून लस टोचून घ्या.
Be First to Comment