जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना नविन शेवा गावाचा 33 हेक्टर जमिनीचा मार्गी लावण्याचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे साकडे
सिटी बेल लाइव्ह । उरण । घनश्याम कडू ।
विस्थापित नवीन शेवे गावचा ३३ हेक्टर जमिनीचा प्रश्न गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन तो मार्गी लावावा अशी मागणी केली आहे.
जेएनपीटी बदरांमुळे पुनर्वसन झालेल्या उरण तालुक्यातील नवीन शेवा गावच्या ३३ हेक्टर जमिनीचा प्रश्न गेली ३४ वर्षा पासून शासनाच्या काही चुकांमुळे प्रलंबित आहे. तो मार्गी लागावा यासाठी माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. ते आमदार असताना त्यांनी मंत्रालयात १० आमदारांना सोबत घेऊन विशेष कृती समितीची स्थापना केली व जवळ जवळ ३५ मीटिंगचे आयोजन करून हनुमान कोळीवाडा व नवीन शेवा गावांचा गेली ३५ वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश आल्याचं दिसून येत आहे कोळीवाडा गावाचा प्रश्न मार्गी लागल्याच्या मार्गावर असतांना, त्यांनी आता नवीन शेवा गावच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी शासकिय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्याचा धडाका लावला आहे.
काल बुधवार दिनांक १० मार्च रोजी अलिबाग येथे जाऊन जिल्हाधिकारी निधी चौधरी मॅडम यांची भेट घेतली व नवीन शेवा गवा संबधी महत्वाची कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त केली व सविस्तरपणे चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.
यावेळी सरपंच आदिनाथ भोईर , ग्रामसुधारणचा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील, सल्लागार चंद्रकांत घरत, ग्रामपंचायत सदस्य, नीरज दर्णे, हितेंद्र घरत जेष्ठ कार्यकर्ते पी डी घरत, राजेंद्र घरत व ग्रामस्थ उपस्थित होते








Be First to Comment