सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।
पोलीस व्हॅनचा चालक ते ठाणे अंमलदार सर्व ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी असे दृश्य खालापूर पोलीस ठाण्यात होते.निमित्त होते जागतिक महिला पोलीस दिनाचे.विशेष म्हणजे महिला राजमध्ये एकाही गुन्हयाची नोंद झाली नाहि.
आयएसओ दर्जा असलेल खालापूर पोलीस ठाणे हद्दीत मुंबई पूणे महामार्ग,द्रूतगती मार्ग,कारखाने तसेच पाच राज्य मार्गामुळे कायम गुन्हे व अपघाताच्या केंद्रस्थानी असत.खालापूर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणे म्हणजे तारेवरची कसरत असताना जागतिक महिला दिनी सर्व कारभार हाती घेत महिला पोलीस कर्मचा-यानी चुणूक दाखवली.

रायगड जिल्ह्यातील पहिली महिला चालक असलेली लतिका गुरव या महिला दिनी पुन्हा चालकाच्या भूमिकेत होत्या.याशिवाय अंमलदार म्हणून अर्पिता खैर,सोनम शेळके,बिनतारी संदेश यंञणेची जबाबदारी हर्षदा बागुल,वर्षा डवरे,दामिनी पथक जबाबदारी राजश्री दवणे,प्रतिक्षा म्हाञे तर या सर्वांना मार्गदर्शक महिला पोलीस उपनिरिक्षक अंबिका अंधारे होत्या.गुन्हा नोंद नाही असा एकही दिवस खालापूर पोलीस ठाण्यात जात नाहि परंतु महिला दिनी एकहि गुन्ह्याची नोंद झाली नाही.
**कोट-कोरोना काळात देखील महिला पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत होत्या.अनेकांची मुल लहान असताना देखील कधीच कर्तव्यात कसूर झाली नाहि.सोमवारी पोलीस ठाण्याचा कारभार उत्तम सांभाळत महिला दिन सुरेख साजरा झाला.
अनिल विभुते-पोलीस निरिक्षक खालापूर








Be First to Comment