Press "Enter" to skip to content

वसुंधरा बचाव संदेशासाठी खालापूर नगरपंचायतीची सायकल रॅली

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।

माझी  वसुंधरा मोहिमे अंतर्गत  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नगरपंचायत खालापूर प्रशासनाने सायकल  रॅली चे  आयोजन केले होते. महिला, मुली, जेष्ठ नागरिक आणि  युवकांनी  उस्फुर्त पणे सहभाग घेतला.वसुंधरेच्या जतनासाठी या कार्यक्रमाचे आयोजन नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

नगरपंचायत हद्दीतील तीर्थक्षेञ महड येथून रॅली ची सुरुवात झाली. संपूर्ण खालापूर नगर पंचायत क्षेत्रातील पाच महसूली गावात  जनजागृती करत नगर पंचायत कार्यालयातील प्रांगणात रॅलीची सांगता झाली. 

निरोगी पर्यावरण व आरोग्य  यासाठी सायकल या संकल्पनेवर  आधारित या रॅलीत सर्वच सायकल वर माझी वसुंधरा बचाव संदेश फलक होते.चांगला प्रतिसाद रॅलीला मिळाला.

सुरेखा भणगे शिंदे-मुख्याधिकारी नगरपंचायत खालापूर

अतिशय शिस्त बद्ध पद्धतीने  कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन न करता हा कार्यक्रम पार पडला गेला.रॅलीमध्येलायन्स क्लब खोपोली,सायकल इंडिया खोपोली, इनर व्हील क्लब,इ 13 कर्जत,आणि नगरपंचायत अधिकारी,कर्मचारी आणि खालापूर नागरिक सहभागी झाले होते.  

 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.