सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड)
महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे . बँकेकडून नाकारला जाणारा कर्ज पुरवठा, नकली बियाणे, युरियाचा तुटवडा काळाबाजार चक्रीवादळ अतिवृष्टी अशी अनेक संकटे शेतकरी झेलत आहे. त्यात भर म्हणून गाईच्या दुधाला भाव नाही. दुधाला भाव मिळवून देण्यासाठी तालुका भाजपच्यावतीने दूध एल्गार आंदोलनाची सुरवात म्हणून भाजपा रयत क्रांती संघटना शिवसंग्राम रासप रिपाई महायुतीच्या माध्यमातून निवेदन कर्जतचे तहसीलदार यांना निवेदन व दुध पिशवी देण्यात आले. तसेच पवित्र दूध देऊन मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना पोचवावे. दुधाला 10 रुपये वाढीव भाव आणि दुधाच्या भुकटीला 50 रु प्रति किलो अनुदान द्यावे, तसे न झाल्यास 1 ऑगस्ट पासून दूध बंद आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला
यावेळी कर्जतचे निवासी तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन आणि दूध पिशवी देण्यात आली.
याप्रसंगी किसन मोर्चाचे प्रदेश चिटणीस सुनील गोगटे, रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष मंदार मेहेंदळे, किसान मोर्चाचे श्रीधर गांगल, शिवाजी पाटील, पुंडलिक पाटील तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते






Be First to Comment