सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू )
बारावीमध्ये उरण तालुक्यात यूएएस शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. तालुक्यात वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रथम ३ नंबर हे यूएएस शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळविले आहे. या यशात विद्यार्थ्यां बरोबर आई वडील, शिक्षक व शाळा कमिटीचा ही सहभाग आहे.
वाणिज्य शाखेत तालुक्यात प्रथम ठाकूर संकेत सूर्यकांत ९०.७७, दुसरा ठाकूर प्रेक्षणा मनोज ९०.१५, तिसरा चव्हाण स्नेहल महेंद्र ८९.८५ तर विज्ञान शाखेत तालुक्यात प्रथम जोशी गरिमा नरेश ९३. ८, दुसरा मोर्या सुशील सुभाष ८८.९२, तिसरा कडवे प्रथमेश धनंजय कडवे ८५. ३८ अशी टक्केवारी मिळविण्यात विद्यार्थी यशस्वी झाले.
वाणिज्य व विज्ञान शाखेत उरण तालुक्यात प्रथम ३ क्रमांक हे यूएएस शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळविल्याने शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे. विद्यार्थ्यांनी या यशात आई वडील, शिक्षक व शालेय कमिटीचे सहकार्य मोलाचे असल्याचे सांगितले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






Be First to Comment