Press "Enter" to skip to content

कर्जत रेल्वे स्थानक येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन, जिआरपी व आरपीएफच्या संयुक्त विद्यमाने कर्जत रेल्वे स्थानक येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाप्रसंगी जिआरपीचे प्रभारी पोलिस निरीक्षक मनोजकुमार माने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, एवढेच नाही तर त्यांना एकाचवेळी दोन्ही बाजु सांभाळून घ्याव्या लागतात. नोकरी करताना कौटुंबिक जबाबदारीही तेवढ्याच ताकदीने त्यांना पार पाडावी लागते हे सांगताना त्यांनी आपल्या सहकारी महिला ठाणे अंमलदार यांचे उदाहरण दिले, सद्या पाळणा घर बंद असल्यामुळे त्यांना आपल्या लहान मुलाला घेऊन आपले शासकीय कर्तव्य पार पाडावे लागत आहे, अशाप्रकारे आम्ही सर्व जण एका कुटुंबाप्रमाणे राहुन आपले कर्तव्य निभावत आहोत. तसेच रात्रीच्या प्रवासात सुरक्षेच्या दृष्टीने महिला प्रवाशांसाठी महिलांच्या डब्यात सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत. तरी काही अडचण असल्यास जिआरपी हेल्पलाइन नंबर 1512 व आरपीएफ हेल्पलाइन नंबर 182 यावर संपर्क केल्यास तुम्हाला तात्काळ मदत मिळेल असे सांगून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

इ.सन. 1890 मध्ये अमेरिकेतील महिलांनी महिलांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून उठाव केला, त्या महिलांना स्वातंत्र्य मिळण्यासाठी 1960 सालाचा काळ उजाडला आणि 1960 रोजी एका महिलेचा युरोप मध्ये सत्कार करण्यात आला आणि त्या दिवसापासून 8 मार्चला महिला दिन साजरा करण्यात येत आहे अशी माहिती आपले मनोगत व्यक्त करताना प्रेरणा भालेराव घोडके ह्यांनी दिली.

महिला, तरुणी घराबाहेर पडुन नोकरी, व्यवसाय करत आहेत तर त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी ह्यासाठी आम्ही तत्पर आहोत असे आरपिएफच्या महिला आरपीएफ शिरीन हुसेन यांनी ह्यावेळी सांगितले. रुपाली मोहिते ह्यांनी स्वतःच्या अस्तित्वाचा एक दिवस साजरा करण्यासाठी उपस्थित असलेल्या महिला सहका-यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन जागतिक महिला दिनाबाबत माहिती दिली. तसेच माधुरी खंडागळे, कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या सदस्या कल्पना दास्ताने, शर्वरी कांबळे, बिनिता घुमरे, सुषमा ढाकणे, मनिषा अथणीकर यांनी महिलांच्या विविध विषयांवर चर्चा, मार्गदर्शन केले.

त्याचबरोबर कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व असोसिएशनच्या सदस्या सुवर्णा जोशी ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मी ज्या ज्या वेळी कर्जत रेल्वे स्थानक येथे येते ते नगराध्यक्षा म्हणुन नव्हे तर रेल्वे प्रवाशांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनची सदस्या म्हणुन येत असते. महिला घर सांभाळून नोकरी करीत असतात पण, त्यांना प्रोत्साहन किंवा त्यांचे कौतुक फारसे केले जात नाही, महिला घर प्रपंच सांभाळून तारेवरची कसरत करुन कामालाही जात असतात तसेच महिलांनी सफाई कामगार ते पंतप्रधान अशी खुप मोठी मजल केलेली आहे, आरपिएफ, पोलिस यंत्रणेसह विविध क्षेत्रात आज महिला खुप छान पद्धतीने काम करत आहेत आणि करत राहतील असे त्यांनी सांगितले.

वो घर भी चलाना जानती है, वो तलवार भी चलाना जानती है, आज की स्त्री कोई कमजोर नहीं है, क्युं की वो पुरा देश चलाना जानती है अशी सुंदर काव्य ओळ जिआरपीच्या महिला पोलिस शिपाई आशा दिपक वाकोडे यांनी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी गायल्याने उपस्थित सर्व महिला अधिकारी कर्मचारी ह्यांच्यात चैतन्य निर्माण झाले.‌कर्जत रेल्वे स्थानक येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास ज्योती सरोदे, शुभांगी देशमुख, वैशाली घुर्वे, दिपाली सुतार, सोनाली माने, गीता तांडेल, साक्षी दिघे, सामीया चौगुले, पुजा पेडणेकर, आशा मुकणे, माधुरी खंडागळे, रेखा गायकवाड, मोहिणी जाधव, विमल गायकवाड, विद्या भालेराव, सुजाता गवळे, काजळ डोंगरे आदिंसह आरपीएफचे आयपीएफ अनिल वर्मा, पीएसआय प्रकाश कदम, ए एस आय राजेंद्र सोमवंशी, कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुरेश खानविलकर, सचिव प्रभाकर गंगावणे, खजिनदार विनोद पांडे, शिवसेवक गुप्ता तसेच आरपिएफ, जिआरपीचे तथा कर्जत रेल्वे स्थानक येथील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.