सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील वडगाव ग्रामपंचायतीच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोरोना काळात आपल्या स्वता:च्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आशासेविका व अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या शासनाच्या धोरणानुसार जे समाजकार्य केलं त्या अनुषंगाने आज वडगाव ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचा कोरोना योद्धा म्हणुन सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी जि.प.सदस्या पद्मा सुरेश पाटील, सरपंच गौरी महादेव गडगे,उपसरपंच सुजाता विश्वनाथ पाटील, पंचायत समितीच्या वाघ मॅडम,ग्रामविकास अधिकारी रश्मीताई शिंदे,सदस्या निता पाटील, सरिता गडगे,कल्पना ठोंबरे, जयश्री पाटील, योगिता भोईर,चंद्रकला वाघमारे तसेच ग्रामपंचायत सदस्य महादेव गडगे,हरेश पाटील, नंदकुमार पाटील, संदेश मालकर,राजेश पाटील, कनिष्ठ अभियंता विजय चौधरी,प्रवीण मुंढे, विकास पाटील आदी कर्मचारी व महिला वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमात सोशल डिस्टिंक्शन चे पालन करण्यात आल्याचे दिसून आले.








Be First to Comment