सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।
जागतिक महिला दिनांचे औचित्य साधून महिला वर्गांचा सन्मान सोहळाचे आयोजन रायगड जिल्हा परिषद शाळा लाडीवली येथे करण्यात आला.महिला मध्ये अनेक गुण लपलेले असते.घर सांभाळत असतांना राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्या सक्रिय आहेत.आज जागतिक महिला दिनांचे औचित्य साधून सर्व महिला वर्ग एकत्र आल्यामुळे त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आज महिला वर्ग पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून काम करीत आहे.घर सांभाळत असतांना वेळात वेळ काढून विविध घरघुती व्यवसाय ते घरीच करीत आहे.यामुळे दैनंदिन जिवनात अर्थिकची कमतरता भासत नाही.शिवाय त्या स्वताच्या पायावर उभे राहत आहे.
तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातील महिला वर्ग एकत्र ऐवून बचत गटाची स्थापना करण्यात आल्यामुळे महिला वर्ग सक्षम बनत चालल्या आहेत. यावेळी जमलेल्या महिलावर्गासाठी पाककृती या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर,मालती म्हात्रे,केशर पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन केले होते.यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. एक आगळावेगळा उपक्रम गावपातळीवर राबविल्यामुळे सर्व महिला आनंदित झाल्या होत्या.








Be First to Comment