सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
रा.जि. प. आदर्श केंद्र शाळा येरळ येथे ८ मार्च जागतिक महिला दिन उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला .सदर कार्यक्रम मा.मुख्याध्यापक श्री खेमसिंग चव्हाण सर,श्री.सुगत राठोड सर, सौ.जानवी मोरे,सौ. निलम शिंदे, सौ.स्मिता मोरे,सौ.सुनीता जाधव, सौ. दीक्षा आयरे,सौ.संगीता सावंत, अंगणवाडी सेविका सौ.अस्मिता कदम, उपशिक्षिका श्रीम.हर्षा काळे या सर्वांच्या उपस्थितीत पार पडला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सौ .दीक्षा आयरे यांनी केले.पुष्पगुच्छ देऊन सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक श्री.खेमसिंग चव्हाण सर यांनी महिलांना मार्गदर्शन केले.अंगणवाडी सेविका सौ.अस्मिता कदम यांनी आहारातील जीवनसत्त्वे यांचे महत्त्व सांगितले. श्रीम.हर्षा काळे यांनी महिलांना सकस व पोषक आहार याबद्दल माहिती सांगितली.आभारप्रदर्शनाने सादर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली








Be First to Comment