जिल्ह्यातील पंधरा हजारहून अधिक गरजू दिव्यांग बांधवांना, निराधार विधवा महिलांसाठी तसेच मोल मजूरी करणारे कामगार यांना जीवनांवश्यक साहित्य, मास्क,स्टॅनीलायझर वाटप
सिटी बेल लाइव्ह / रायगड /अमूलकुमार जैन #
कोरोना विषाणूने रायगड जिल्हा सहित सर्वत्र हाहाकार माजविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांवर उपासमारीची वेळ येऊ लागली.अशी वेळ दिव्यांग बांधवांवर येऊ नये म्हणून त्यांच्या मदतीला धावून आली ती अपंग संघर्ष समिती आणि आई फाऊंडेशन.
कोरोना या विषाणूंमुळे भारतासहित जगात लाखोंच्या संख्येत बळी घेतले आहे.त्यामुळे प्रशासनाने कोरोना या विषाणूची वाढती साखळी तोडण्यासाठी साठी 22 मार्च 2020 पासून वेळोवेळी संचारबंदी लागू केली. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडू लागल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.त्यामुळे सदृढ व्यक्ती हतबल झाले त्याच्यापुढे दिव्यांग काय करणार.त्यांनी एकतर भीक मागावी अन्यथा आत्महत्या करावी हे दोन पर्याय समोर होते.मात्र दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी अपंग संघर्ष समिती सहित आई फाउंडेशन ही धावून आली.आणि त्यांनी जिल्ह्यातील जवळपास पंधरा हजारहून अधिक गरजू दिव्यांग बांधवांना, निराधार विधवा महिलांसाठी तसेच मोल मजूरी करणारे कामगार यांना जीवनांवश्यक साहित्याचे वाटप केले.त्याचबरोबर त्यांना मास्क,स्टॅनीलायझर,यांचे सुद्धा वाटप करण्यात आले.
आई फाऊंडेशन चे अध्यक्ष राजू साळूंके, उपाध्यक्ष सागर पवार अपंग संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार अमुलकुमार भलगट यांचे सगळ्याकडून कौतुक होत आहे






Be First to Comment