सिटी बेल लाइव्ह । श्रीवर्धन । केतन माळवदे ।
येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप प्राचार्य श्री. निलेश चव्हाण, तर मुख्य अतिथी, म्हणून श्रीवर्धन पोलीस स्टेशनच्या पीएसआय, सौ. संगिता गावडे, दामीनी पथकाच्या सौ. कविता देवर्डैकर, श्रीवर्धन येथील नाळे हाॅस्पिटलच्या डॉ. सौ. सुवर्णा नाळे, श्रीवर्धन येथील वकील व महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी कु. गोदावरी करडे, आराठी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. नाझ काझी भाभी तसेच महाविद्यालयीत महीला विकास मंचच्या व अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका सौ. दिपाली पाठराबे, सांस्कृतिक विभाग प्रमुख व आय क्यु एसी प्रमुख डॉ. सौ. कल्याणी नाझरे, एन एस एस विभाग प्रमुख व इतिहास विभागाचे प्राध्यापक श्री. किशोर लहारे, मराठी विभागाच्या प्राध्यापिका सौ. म्रुण्मयी भुसाने, वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनी व प्राध्यापक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. स्वाती पानसरे व प्रा. सौ. शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, महीला विकास मंचच्या प्रा. सौ. दिपाली पाठराबे यांनी केले. सर्व प्रथम अतिथींच्या हस्ते सरस्वती प्रतीमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी महीलांच्या आरोग्य समस्या, कायदेविषयक सल्ला, राष्ट्रीय विकासात महीलांचा सहभाग, गुन्हेगारी इत्यादी विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे शेवटी प्रा. सौ. म्रुण्मयी भुसाने यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ श्री श्रीनिवास जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.








Be First to Comment