सिटी बेल लाइव्ह । उरण । बातमीदार ।
उरण मधील भेंडखळ बीट ,जासई बीट, कोप्रोली बीट,जसखार बीट,नागाव बीट या पाच बिटांमधील 105 आंगणवाड्यांमध्ये जागतीक महीला दिना साजरा करण्यात आला. यावेळी प्रत्येक आंगणवाडी मध्ये विवीध कार्यक्रम घेण्यात आले.
कोरोना काळात आपल्या जीवावर उदार होवून सातत्यपूर्ण काम करणारा सरकारी मानधनी घटक म्हणजे आंगणवाडी सेवीका. तरीही दुर्लक्षीत राहीलेला हा घटक नेहमी प्रमाणे सातत्याने काम करत आहे.आज जागतीक महीला दिनी आपल्या स्व: सन्मानार्थ उरण मधील आंगणवाणी सेवीकांनी आपापल्या आंगणवाडी क्षेत्रात विवीध कार्यक्रम आयोजीत केले होते.त्या मध्ये स्त्री शक्ती चे महती सांगणारी व्याख्यान पर भाषणे,तर काही ठिकाणी आरोग्याबाबत काळजी घेणारे मार्गदर्शन आसे कार्यक्रम आयोजीत केले होते.


चिरनेर व भोम येथील आंगणवाड्यांवर जावून डाॅ. आमृता जोशी यांनी महीलांना आरोग्य विषयी माहीती दिली. तसेच उपस्थीत महीलांच्या आरोग्याची तपासणी केली.तर मोठी जूई येथेही महीला शक्ती विषयी मार्गदर्शन करण्यात आले.तय खोपटे येथे लहान मूलींनी वेगवेगळी वेषभूषा करून स्रीयांच समाजातील योगदान दाखवून दिले यावेळी खोपटे सरपंच विशाखा पाटील उपस्थीत होत्या.








Be First to Comment