Press "Enter" to skip to content

महिलांना व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण : कर्जत नगरपरिषदेचा उपक्रम

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने नगरपरिषद क्षेत्रातील महिलांना व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते, महिला दिनाचे औचित्य साधून शिबिरात सहभाग घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

महिला व बालकल्याण समितीच्यावतीने नगरपरिषद क्षेत्रातील महिलांना व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते, बेकरी प्रॉडक्ट तयार करणे यामध्ये 42 महिलांनी तर
मसाले तयार करणे यामध्ये 32 महिलांनी शिबिरात सहभाग घेतला, सात दिवस चाललेल्या या शिबिरात Q 8 सिस्टीम या टीम मधील किरण गायकवाड व दक्षा गायकवाड यांनी महिलांना प्रशिक्षण दिले.

शिबिरात सहभाग घेतलेल्या महिलांना काल दि.8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्य अशोक ओसवाल, बांधकाम सभापती स्वामिनी मांजरे, महिला व बालकल्याण सभापती संचिता पाटील, उपसभापती प्राची डेरवणकर, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती वैशाली मोरे नगरसेविका पुष्पा दगडे, मधुरा चंदन, सुवर्णा निलधे, नगरसेवक बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे उपस्थित होते.

व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते 74 महिलांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.प्रशिक्षणार्थी अनुजा आफळे,नंदा नागे, योगिता कडू यांनी शिबिराचा चांगला अनुभव सांगून नगरपरिषदेच्या उपक्रमाचे कौतुक केले.

प्रशिक्षक किरण गायकवाड यांनी नुसतं प्रशिक्षण घेऊन थांबा नका, स्वयंरोजगार सुरू करा असे सांगितले.

बांधकाम सभापती स्वामिनी मांजरे यांनी महिला दिनाचे महत्व सांगितले.
नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती या पदावर महिला स्थापन्न झाल्या होत्या, महिलांनी नवीन नवीन शिकण्याची जिद्द ठेवली पाहिजे, नगरपरिषद तर्फे प्रथमच सुवर्ण कन्या योजना सुरू केली आहे, स्वतः ची काळीज घ्या महिलेची सहनशक्ती पुरुषापेक्षा जास्त आहे आपण आपल्या परिसर स्वच्छ ठेवा असे सांगितले.

प्रशिक्षण घेतल्यावर छोटा मोठा व्यवसाय करा आणि कुटुंबाला हातभार लावा असे सांगितले.सूत्रसंचालन रविंद्र लाड यांनी केले तर लेखनिक ऋषिता शिंदे यांनी आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.