धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश कोकळे यांचे वरिष्ठांना साकडे
सिटी बेल लाइव्ह । माथेरान । मुकुंद रांजाणे ।
माथेरान मध्ये अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या घोड्यांची संख्या जवळपास ४६० इतकी असून दरवर्षी या घोड्यांच्या मालकांना परवाने देऊन घोड्यांची पासिंग येथील पोलीस ठाण्यात मार्च महिन्यात केली जाते. मागील तीन वर्षांपासून पासिंग केली जात नसल्याने धनगर समाजाचे अध्यक्ष तथा अश्वमालक राकेश कोकळे यांनी रायगड जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक अलिबाग यांना निवेदन सादर केले आहे.
सध्यातरी इथे पर्यटकांना पॉईंट्सची सैर करण्यासाठी घोडा हे एक हौशी वाहन उपलब्ध आहे. दरवर्षी मार्च महिन्यात येथील पोलीस ठाण्यात सर्व अधिकृत परवानाधारक घोड्यांची पासिंग करून त्यांना नंबर दिले जातात.सन २०१९-२०२०-२०२१ या वर्षात घोड्यांची पासिंग घेण्यात आली नाही.तर मागील मार्च महिना कोरोना संकट काळ असल्याने सर्व घोड्यांचे व्यवसाय आणि पूर्णतः लॉक डाऊनचा कार्यकाळ असल्याने मागील वर्षी पासिंग होऊ शकली नाही. निदान यावर्षी तरी घोड्यांची पासिंग घ्यावी या आशयाचे निवेदन राकेश कोकळेंनी दि.८ मार्च रोजी अलिबाग येथे जाऊन समक्षपणे वरिष्ठांना सादर केले आहे.
त्यामुळे लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा अश्वपाल करीत आहेत. यावेळी त्यांच्या सोबत किशोर कासुरडे आणि अन्य स्थानिक भूमिपुत्र अश्वपाल उपस्थित होते.








Be First to Comment