Press "Enter" to skip to content

मोहोपाड्यात श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे आगमन,दर्शंनासाठी भाविकांची गर्दी

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे रविवारी दुपारी मोहोपाडा येथे आगमन होताच स्वामींच्या भक्तगणांनी उपस्थित राहून दर्शंन घेतले.कोरोना महामारीत भाविकांना अक्कलकोटला जाता न आल्याने श्री स्वामीं च्या पादुकांचे दर्शन झाल्याने भक्तांचे मन भरून आले.

रसायनी परीसरातील मोहोपाडा येथे श्री स्वामी समर्थांच्या भक्तांची संख्या मोठी आहे.परीसरातील स्वामींचे काही भक्तगण महिनाआड अक्कलकोटला दर्शनासाठी जातात.परंतु गेल्या एक वर्षांच्या कालावधीत कोरोना पाश्र्वभूमीवर मोठे संकट आल्याने काही काळ मंदिरेही बंद होती.

यावेळी श्री स्वामी समर्थांच्या भक्तगणांना दर्शंनाची आस लागून राहिली होती.यातच श्री स्वामींच्या पादुकांचे मोहोपाडा येथे आगमन होणार हे समजताच भक्तांना आनंद झाला.यावेली श्रीं स्वामींच्या पादुकांचे दर्शन व्हावे यासाठी स्वामींच्या पादुका अक्कलकोटशी मोहोपाडा येथील अनिल दत्तात्रेय अहिर, सुभाष दत्तात्रेय अहिर, सुनील दत्तात्रेय अहिर यांच्या निवासस्थानी येताच ओवाळणी करून पुष्पवर्षांव करण्यात आला.यानंतर अनिल अहिर यांच्या निवासस्थानी पादुकांची पुजा-अर्चा करून पूजन करण्यात आले.यावेली श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे भक्तगणांनी दर्शंन घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.