Press "Enter" to skip to content

कितीही संकटे आली तरी भूमिपुत्रांना न्याय मिळणारच!- दिनेश कातकरी

सिटी बेल लाइव्ह /गोवे कोलाड ( विश्वास निकम)

ऐनघर पंचक्रोशी ग्रामीण युवा बेरोजगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर विरोधकांनी कितीही संकटे आणण्याचा प्रयत्न केला तरीही संघटनेचे अस्तित्व कधीच मिटणार नाही.संघटनेचे सर्व पदाधिकारी शेवटच्या श्वासापर्यंत लढून भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणारच असे परखड मत बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश कातकरी यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, ऐनघर पंचक्रोशी ग्रामीण युवा बेरोजगार संघटना साधारण दोन वर्षांपूर्वी रोहा तालुक्यात उदयास आलेली असताना सदरच्या बेरोजगार संघटनेने जिंदाल पाईप कारखान्यांमध्ये भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कायद्याच्या मार्गाने लढा निर्माण केलेला आहे.त्याचबरोबर ‘लढा!भूमिपुत्रांच्या अस्तित्वासाठी!! सर्वांगीण विकासासाठी!’अशा स्वरूपाच्या संघटनेच्या ब्रीदवाक्या प्रमाणे संघटनेने कार्य करत तरुण पिढीला सुसंस्कारित करण्यासाठी राष्ट्रमाता आई जिजाऊ जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला तसेच कोणत्याही गावात अन्याय होत असल्यास कंपनीच्या सांडपाण्याचा अन्याय होत असल्यास तेथे संघटनेने नेहमी पुढाकार दाखविला आहे. याकरिता अनिकेत तटकरे,तहसीलदार मॅडम व सर्व पदाधिकारी तसेच नागोठणे पोलीस ठाणेचे सर्व अधिकारी यांनी वेळोवेळी विशेष सहकार्य केलेले आहे.अशाप्रकारे संघटनेचे कार्य शांततेच्या मार्गाने चालू असताना दिनांक ९जूलै २०२० रोजी संध्याकाळी सात वाजता निशिकांत गोपीनाथ मोरे,वैभव विकास गोवर्धने,विशाल मनोहर सुटे,नम्रता मनोहर सुटे यांनी बेरोजगार संघटनेचे पदाधिकारी मा.सतीश नारायण सुटे(उपाध्यक्ष) यांनाघरी जाऊन शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली याचे प्रमुख कारण जरी समजू शकलेले नाही तरी त्या दिवशीच्या निशिकांत मोरे यांनी सतीश सुटे यांना केलेल्या फोन रेकॉर्डिंग वरून सदरचा संवाद वैयक्तिक नसून संघटनेच्या विरोधात असल्याचे समजते याविषयी मात्र पोलिस अधिकारी नागोठणे यांनी भारतीय दंड संहिता कलम३४,५०४,५०६,५०७नुसार गुन्हा नोंदवून न्याय प्रक्रियेसाठी पुढे पाठवण्यात आल्याचे समजते यामुळे हा विषय सध्या तरी न्यायप्रविष्टअसल्याचे समजते तरी या सर्व प्रकारामुळे बेरोजगार संघटनेने या व अशा कितीही प्रकारची संकटे आली तरी अठरा गावातील भूमिपुत्रांना अठ्ठावीस वर्षात जो हक्काचा न्याय मिळालेला नाही त्या साठी सर्व प्रकारचा संघर्ष करण्याचा संघटनेने पवित्र घेतल्याचे समजते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.