सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू ।
उरणमधील सेफ्टीझोनचा प्रश्न प्रलंबित आहे. तो निकाली काढावा यासाठी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे.
घर व जमीन बचाव समिती तसेच माजी आमदार मनोहर शेठ भोईर अणि समितीचे अध्यक्ष महेश म्हात्रे सरचिटणीस संतोष पवार यांनी सदर प्रश्नाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा चालू ठेवल्या मुळे राज्यसरकारने जी नौदलाचे सुरक्षा पाट्ट्या बाबतची दि. 14-8-2019 रोजी पाठविलेल्या प्रस्तावावर कोणत्याही प्रकारे निर्णय मिळाला नसल्यामुळे राज्याचे मुख्य सचिव यांचेकडे पत्रव्यवहार करुन तसेच प्रत्यक्ष भेटून या प्रश्ना संदर्भात चर्चा करून सदर प्रकरणाचा पाठपुरावा राज्य सरकारच्या माध्यमातून होणे आवश्यक असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून मा. सचिव, संरक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्याकडे स्मरण पत्र पाठविणे बाबत आग्रह केल्याप्रमाणे सदर स्मरणपत्र भूषण गगराणी, प्रधान सचिव, नगर विकास, विभाग यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले आहे.
तसेच या संदर्भात शनिवार दि. 6 मार्च 2021 रोजी खासदार श्रीरंग बारणे यांना या बाबत संरक्षण मंत्रालय दिल्ली येथे पाठपुरावा करण्या संदर्भात माजी आमदार मनोहर शेठ भोईर आणि घर व बचाव समितीचे सरचिटणीस संतोष पवार यांनी प्रत्यक्ष भेटून सेफ्टी झोन बाधित जनतेच्या वतीने विनंती केली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी पाठपुरावा करून लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.








Be First to Comment