सिटी बेल लाइव्ह । उरण ।
उरण तालुक्यातून होणार्या महत्वपूर्ण द्रोणागिरी महोत्सव 2021 या क्रीडा महोत्सवामध्ये झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये उरणच्या रोहन म्हात्रे याने आपल्या पिळदार शरीराचे उत्तम प्रदर्शन करत टायटल विजेता ठरला आहे. रोहनच्या सादरीकरणाने उपस्थित शरीरसौष्ठव स्पर्धक आणि प्रेमींनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. तर जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
उरण तालुक्यात दरवर्षी द्रोणागिरी महोत्सव भरविण्यात येतो. यावर्षी द्रोणागिरी मोहोत्सव 20 वर्षात पदार्पण करत आहे. या महोत्सवाअंतर्गत विविध कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षीही अशाच प्रकारचा महोत्सव भारावून, कलाकार आणि क्रीडा प्रेमींना प्रोत्साहन देण्यात आले. या महोत्सवामध्ये शरीर सौष्ठव स्पर्धा आकर्षणाचा भाग ठरली.


या स्पर्धेममधील जिल्हा स्तरीय द्रोणागिरी श्री 2021 हे टायटल उरणच्या रोहन विकास म्हात्रे याने जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतल्या. स्पर्धेवेळी रोहनने आपल्या पिळदार शरीर्यासाठीचे उत्तम प्रदर्शन करत प्रेक्षकांसह पंचानाही मोहीत केले आहे. प्रत्येक फेरीमध्ये रोहनने उत्तम प्रदर्शन केल्याने आलेल्या प्रेक्षकांकडून उत्तम दाद मिळवली आहे. तर रोहनच्या या कामगिरीबद्दल त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment