रायगड पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल : अलीबाग – शहापूर येथील प्रकार
सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन ।
- अलिबागमध्ये खोटया कागदपत्रांव्दारे जमिन विक्रीचे रॅकेट कार्यरत असल्याबद्दल आम्ही वारंवार वृत्ते प्रसिध्द केली आहेत. या वृत्ताला दुजोरा देणारी घटना तालुक्यातील शहापूर येथे घडली असून या प्रकरणात रायगडच्या पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल करण्यांत आली आहे.
- नंदकुमार वसंत पाटील यांच्या मालकीची मौजे शहापूर सर्वे नं . ३९१ पो.नं. ३ क्षेत्र ०-४३-८० ( हे.आर ) हि सामाईक जमिन बेकायदेषीररित्या स्वतःच्या नावे करणा-या व्यक्ती, तत्कालीन ग्रामसेवक ग्रुप ग्रामपचायत शहापुर, ग्रामपंचायत शहापुर चे क्लार्क रसुल काशिनाथ पाटील, तत्कालीन तलाठी सजा शहापुर , मंडळ अधिकारी ( सर्कल ) शहापुर व वारस नोंद होताना वर्दीवर सहया करणारे पंच या सर्वांनी मिळून संगनमताने त्यांच्या नावे केली असल्याची तक्रार पाटील यांनी पोयनाड पोलीस ठाण्यातही दाखल केली आहे.
नंदकुमार पाटील यांचे वडिल कै .वसंत रामचंद्र पाटील जीवंत असताना मयत दाखवून खोटा मृत्युचा दाखला ग्रामपंचात शहापुर येथे सादर करून वर नमुद मिळकतीवर त्यांचा मृत्यू दि . २७ /०७ /१९९८ साली झाला असा दाखवून यतसा खोटा दाखला ग्रुपग्रामपंचायत शहापूर यांचे कडून मिळवून खोटी वारस नोंद करून जमिन शहापूर येथील त्रयस्थ व्यक्तीच्या नावे केली आहे. या त्रयस्थ व्यक्तीने ही जमिन तिस-याच व्यक्तीला विकली असून मुळ वारसदार नंदकुमार पाटील यांना अंधारात ठेवले आहे. कै .वसंत रामचंद्र पाटील पाटील हे दि . २७ /०७ /१९९८ रोजी जिवीत होते. त्यांना कागदोपत्री मयत दाखविण्यांत आले असल्याची धक्कादायक बाब तक्राददार यांनी पोलीसांच्या नजरेस आणून दिली आहे. याकामी जमिन विक्री करणारे व संबंधीत ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे कारकून यांनी मिळून वडिलांना खोटा मृत्यूचा दाखला बनविला असा आरोप तक्रारदार यांनी केली आहे. - सदरचा खोटा मृत्यूचा दाखला पाहिला असता त्यामध्ये गृत्यूचे ठिकाण धाकटे शहापुर असे दाखविण्यात आलेले आहे व मृत्यूनोंद रजिस्टर पाहिले असता त्यांचा कायम राहण्याचा पत्ता धाकटे शहापुर खोडून कमळपाडा असा केलेला आहे . यावरून मृत्यू दाखला बनावट बनविलेला असल्याचा सिध्द होत आहे.
- विषेश म्हणजे कै .वसंत रामचंद्र पाटील पाटील हे दि . २७ /०७ /१९९८ रोजी जिवीत होते असा दाखला षहाबाज ग्रामपंचायतीने तसेच पंचमंडळींनी देवूनही वसंत रामचंद्र पाटील यांना त्यांच्या हयातीत न्याय मिळू शकला नाही. उलट बनावट मृत्यू दाखल्याच्या आधारे जमिन नावावर करून घेणा-यांनी आता ती तिस-याच व्यक्तीला विकली आहे. त्यामुळे नंदकुमार वसंत पाटील यांनी त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी जमिन बळकावणा-या व्यक्ती, तत्कालीन ग्रामसेवक ग्रुप ग्रामपचायत शहापुर, ग्रामपंचायत शहापुर चे क्लार्क रसुल काशिनाथ पाटील, तत्कालीन तलाठी सजा शहापुर, मंडळ अधिकारी शहापुर व वारस नोंद होताना वर्दीवर सहया करणारे पंच या सर्वांविरोधात जिल्हा पोलीस अधिक्षकांसह पोयनाड पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे.







Be First to Comment