सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन ।
जेएसएम महाविद्यालय, अलिबाग- रायगड एनसीसी युनिट येथे ५ दिवसीय आणि ३ दिवसीय सी.ए.टी.सी. शिबिराचे आयोजन १ मार्च ते ५ मार्च या कालावधीत ६ महाराष्ट्र बटालियन मुंबई ‘ए’ ग्रुपने केले होते. कोविड -१९ साथीच्या पार्श्वभूमीवर एनसीसी युनिट स्तरावर हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
प्रत्येक युनिटवरील एनसीसी ‘बी’ आणि ‘सी’ प्रमाणपत्रांच्या मार्गदर्शनसाठी ही शिबिरे आयोजित केली जातात. जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग येथे आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड आणि जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबागच्या एन.सी.सी. युनिटचे संयुक्त शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ८८ कडेट सहभागी झाले होते. शिबिराचे आयोजन ६ महाराष्ट्र बटालियनचे असून बटालियन कमांडिंग ऑफिसर कर्नल शिरीष पांडे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले.


शिबिराच्या दरम्यान, कॅडेटांना ड्रिल, नकाशे वाचन, शस्त्रांची माहिती, सामाजिक क्रियाकलाप इत्यादी प्रशिक्षण देऊन कॅडेट्सना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले. हे प्रशिक्षण सैन्याच्या नियमित पीआय स्टॉफ द्वारा देण्यात आले आहे. १ मार्च ते ५ मार्च या कालावधीत हे शिबिर घेण्यात आले. या वेळी नियमानुसार सोशल डिस्टनसिंग चे पालन करण्यात आले .शिबिराचे उद्घाटन प्रशासकीय अधिकारी ६ महारष्ट्र बटालियन एनसीसी कर्नल डीसिल्वा सर यांच्या हस्ते करण्यात आले आणि समापन कर्नल शिरीष पांडे कमांडिंग ऑफिसर 6 महाराष्ट्र यांनी केले. या शिबिरामध्ये कॅम्प एडजुटेंटची भूमिका कॅप्टन डॉ.महसीन खान यांनी साकारली आणि जे.एस.एम अलिबागचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील सर यांनी सर्वांचे आभार मानले.








Be First to Comment