सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)
नवीन पनवेल मधून जुन्या पनवेल ( तक्का ) मध्ये जाण्यासाठी अवघ्या सहा महिन्यांपूर्वी बांधलेल्या भुयारी मार्गाची सध्या अवस्था दयनीय झाली असून तातडीने या भुयारी मार्गाची पुन्हा दुरूस्ती करावी अशी मागणी या परिसरातील रहिवासी करीत आहेत. नवीन पनवेल मधील सेक्टर 15, 15 ए, 16, पोदी व विचुंबे या भागातून राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी पोदी जवळील रेल्वे गेट ओलांडून किवा एच.डी.एफ.सी. सर्कलच्या पूलावरुंन जावे लागत होते. या पुलावर नेहमीच वाहतुकीची कोंडी व्हायची कारण माथेरान रस्त्याकडून व डी मार्ट भागातून येणारी वाहतूक ही या पूलावरुंनच होत असते.या भागाचा विकास झपाट्याने झाल्याने मोठे प्रकल्प उभे राहिले. नागरी वस्ती वाढल्याने वाहतूक वाढली त्यामुळे रोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत असल्याने पोदी जवळ असलेल्या रेल्वे गेटचा वापर नागरिक व विद्यार्थी धोकादायक पद्धतीने करीत होते. त्यामुळे या भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली होती. या भुयारी मार्गासाठी 10 करोडपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. मात्र आता पाऊस चालू झाला आणि अवघ्या सहा महिन्यातच आज त्या भुयारी मार्गाची गाळण झालेली पाहायला मिळेल. पाणी गळतय, खाली पाणी गुढगाभर साचतंय, रात्रीच्या वेळेस विजेची सुविधा नाही, भूयारी मार्गाच्या आजूबाजूला कचऱ्याचा ढीग. त्यातच पाणी साचल्यामुळे वाहनांना ये जा करण्यासाठी नाहक त्रास, तुंबलेल्या पाण्यामुळे वाहने विरुद्ध दिशेने प्रवास करताना पाहायला मिळेल आणि याचमुळे अपघात होण्याची दाट शक्यता.कुठे आहे तरी पनवेल महानगरपालिका व रेल्वे प्रशासनाने या नागरी प्रश्नाकडे लक्ष घालून तातडीने समस्या निकाली लावावी अशी मागणीया परिसरातील रहिवासी करीत आहेत.






Be First to Comment