नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर व जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून पनवेल येथील सिद्धी क्लिनिक येथे आयोजन
सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक ०७ रोजी नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर व जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून पनवेल येथील सिद्धी क्लिनिक येथे महिलांकरिता मोफत थायरॉइड टेस्ट व मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा पनवेल शहरातील विविध भागातील महिलांनी लाभ घेतला.


या शिबिराला पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी भेट दिली व उत्तम कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.


यावेळी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, विलास मोहोकर, मनिषा परदेशी, पूर्णिमा गायकर, वैशाली शहा, विचारे, सरिता पाटणकर तसेच सुशील गार्डन येथील महिला सदस्य उपस्थित होते.








Be First to Comment