Press "Enter" to skip to content

खालापूर नगरपंचायतीचे स्वच्छता अभियान

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।

रविवार सुट्टीचा दिवस असताना देखील नगरपंचायत खालापूरच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यानी पुढाकार घेत सर्व शासकिय कार्यालय परिसरात स्वच्छता मोहिम राबवली.

स्वच्छ खालापूर सुंदर खालापूर नगरपंचायतीचे घोषवाक्य आहे.रविवारी सकाळी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे,नगर अभियंता देवेंद्र मोरखंडीकर,सुरेश पोसतांडेलसह सर्व कर्मचारी आणि सफाई कामगार स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

खालापूर शहरातील तहसील कार्यालय आवार, पंचायत समिती, वन विभाग कार्यालय, न्यायालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, निबंधक कार्यालय आणि लगतचा सर्व परिसरात साफसफाई करण्यात आली.माझी वसुंधरा मोहिमे अंतर्गत नगर पंचायत दर पंधरा दिवसांनी स्वच्छता मोहिम राबविणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.