भारत विकासपरिषदेचे सेवाकार्य
श्रीनिवास काजरेकर
भारत विकास परिषदतेची पनवेल शाखा आणि एमपॉव्हर इंडिया या संस्थांच्या वतीने कर्जत तालुक्यातील कशेळे या गावामधे मुलींसाठी मोफत हिमग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या शिबिरामधे आदिवासी पाडे तसेच दुर्गम पाड्यांमधील मुलींची मोफत हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. ११ ते १९ या वयोगटातील ५५० मुलींनी या शिबिराचा लाभ घेतला.
सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्क या गोष्टींची खबरदारी घेवून आसपासच्या वस्त्यांमधून या मुलीना शिबिराच्या ठिकाणी आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी शाळेतील शिक्षकवर्गाने सहाय्य केले. सर्व मुलींना जंताच्या व रक्तवाढीच्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. मुंबई येथिल सैफी रुग्णालयाच्या डॅाक्टर व इतर कर्मचारी वर्गाने यासाठी मदत केली.
या शिबिराला रोटरॅक्ट क्लब ऑफ मुंबईचे अध्यक्ष व सभासद
उपस्थित होते. भारत विकास परिषदेतर्फे ज्योती कानिटकर, पद्मजा कुलकर्णी , ज्योती कोळी व डॉ. कीर्ती समुद्र यांनी या शिबिराचे यशस्वी नियोजन केले


भारत विकास परिषदेने “एनामियामुक्त भारत” ही आरोग्यदायी योजना हाती घेतलेली आहे. त्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी, दुर्गम पाडे, मागास वस्त्यांमधे हा उपक्रम राबविला जात आहे.डॉ. कीर्ती समुद्र,
भारत विकास परिषद, पनवेल.







Be First to Comment