Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी राजेश कोळी

सिटी बेल लाइव्ह । उरण । घनश्याम कडू ।

महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी राजेश कोळी यांची निवड करण्यात आली. त्यांना पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी नियुक्तीपत्र दिले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षअध्यक्ष राज ठाकरे यांच्या सहकार्याने युवानेते अमीत ठाकरे यांच्या आदेशाने मनसे पर्यावरण विभाग राज्य अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी राज्य उपाध्यक्षपदी उरणचे मनसे समर्थक राजेश कोळी यांची निवड केली आहे.

राजेश कोळी यांच्याकडे पक्षाचे विविध जबाबदाऱ्या आहॆत ते मनसे विध्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष, मनसे शिक्षक सेनेचे राज्य चिटणीस, मनसे चित्रपट सेनेचे संघटक अशी विविध पदे यशस्वी पणे गेले १४ वर्ष सांभाळत आहॆत.
राजेश कोळी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर पक्षाने मनसे पर्यावरण विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड करून आणखीन एक जबाबदारी सोपविली आहे. मनसे पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी राजेश कोळी यांची निवड जाहीर करून नियुक्ती पत्र ही दिले. राजेश कोळी हें कोकण विभागातून राजसाहेब यांचे खंदे समर्थक मानले जातात.

पक्षाने दिलेली नवीन जबाबदारी आपण यशस्वीपणे सांभाळून पर्यावरणाची जपवणूक करण्यासाठी प्रयत्न करू असे नवनिर्वाचित मनसे पर्यावरण उपाध्यक्ष राजेश कोळी यांनी सांगितले. मनसे पर्यावरण उपाध्यक्षपदी राजेश कोळी यांची निवड जाहीर होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.