Press "Enter" to skip to content

नवीन शेवा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला

सरपंचपदी शिवसेनेचे आदिनाथ भोईर यांची बिनविरोध निवड

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

नविनशेवा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेचे आदिनाथ भोईर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आज ग्रामपंचायत नवीन शेवा सरपंच पदाची निवडणूक शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत कार्यालय नवीन शेवा येथे घेण्यात आली होती.
सदर सरपंच पदासाठी आदिनाथ भोईर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी त्यांची सरपंच पदी निवड झाल्याचे घोषित केले.

२०१७ साली झालेल्या थेट सरपंच निवडणूकीत सरपंच निशांत घरत हे निवडून आले होते . त्यांच्या निक्रीय कार्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केला होता. त्यानंतर ग्रामसभेतही ग्रामस्थांचा अविश्वास ठराव मंजूर करून सरपंच निशांत घरत यांना पायउतार व्हावे लागले होते. आज त्यांच्या जागी आदिनाथ भोईर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड होताच फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले.

तद्नंतर शिवसेना शाखेत सरपंच आदिनाथ भोईर यांच्या सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर सत्कारावेळी रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी गावातील जी प्रलंबित कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी सरपंच आदिनाथ भोईर व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रयत्न करावेत आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आपल्या मनोगतातून शुभेच्छा देताना व्यक्त केले. त्याच प्रमाणे उपजिल्हाप्रमुख नरेशजी रहाळकर, भाजपचे चंद्रकांत घरत, उपतालुका प्रमुख कमळाकर पाटील यांनी आपल्या मनोगतातून सरपंच आदिनाथ भोईर यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उप तालुका संघटक कृष्णा घरत यांनी केले.
कार्यक्रमा प्रसंगी सरपंच आदिनाथ काशिनाथ भोईर व उपसरपंच वनिता विलास म्हात्रे यांचा सत्कार रायगड जिल्हाप्रमुख मा आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आला.

काँग्रेस नेते श्री महेंद्र घरत, सौ रेखा म्हात्रे व इतर मान्यवर हेही नवनिर्वाचित सरपंच आदिनाथ भोईर याना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य हिराजी घरत,ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश म्हात्रे, शाखाप्रमुख शैलेश भोईर, उपशाखाप्रमुख सुरेश पाटील, अशोक म्हात्रे, कार्याध्यक्ष प्रकाश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य नीरज दर्णे , नयना ठाकूर, भुपेंद्र पाटील, मंजुळा घरत, रंजना घरत, जयश्री घरत, हितेंद्र घरत त्याचप्रमाणे नामदेव घरत, भारत भोईर, जयवंत घरत, अजय सुतार, पंकज सुतार महिला आघाडीच्या शाखा संघटक वैशाली सुतार, मयुरी घरत , प्रमिला घरत, मनिषा घरत, जागृती घरत व शिवसैनिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.