छावा प्रतीष्ठानने लावलेली झाडे ही जळाली
सिटी बेल लाइव्ह । उरण । बातमीदार ।
इंद्रायणी डोंगर परीसरात लागलेल्या आगीमूळे अनेक झाडे व नव्याने वृक्षसंवर्धन करण्यात आलेली झाड आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत.त्यामध्ये छावा प्रतीष्ठान चिरनेर ने लावलेली झाडे ही जळाली आहेत. तरीही ही झाडं जगवीण्यासाठी या मंडळाचे सदस्य सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रयत्न करत आहेत.
उरण मध्ये सातत्याने लागले जाणारे वा लावले जाणारे वणवे थांबवीण्यास कमी मनुष्यबळ आसणार्या उरण वनवीभागाला व येथील जनतेला येणारे आपयश वृक्षसंवर्धनास बाधा ठरत आहे.उरण मध्ये कुठे ना कुठे सातत्याने लागणारे वणवे ही चिंतेची बाब आसून उरण मधील वन संपदा कमी करण्यास हातभार लावीत आहे.

दि. 4 रोजी लागलेल्या वणव्या मध्ये छावा प्रतीष्ठानने उंच पठारावर लावलेली व गेली 2 वर्ष अथक प्रयत्नाने जगवीलेली 80 च्या वर झाडे जळाळी आहेत.त्याचबरोबर आगोदर जगवीलेल्या 200 च्या वर कडूनिंबाची झाड व उपजत आसलेल्या 1000 च्या वर झाडांना आगीची झळ लागली आहे.तरीही छावा प्रतीष्ठान चिरनेरचे सदस्य सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आशाळभूतपणे ती झाड जगवीण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ताबडतोब त्यांनी 400ली. पाणी या डोंगरावर वाहून नेवून या झाडांना दीले.त्यापाठीमागे एकच उद्देश जर त्या झाडांचा मूळ जीवंत आसेल तर पालवी काढेल.

चांगल्या कामात आडथळे हे ठरलेलेच आहेत.दुख: झाले आहेच.परंतू प्रत्येकाने लक्षात ठेवल पाहीजे निसर्ग हा पृथ्वीतलावरील सजीवांचा आत्मा आहे.प्रत्येकाने त्याचे रक्षण करणे गरजेच आहे.निराश झालो तरी हिम्मत हारलो नाही आहोत.प्रयत्न चालूच राहतील
सुभाष कडू : संस्थापक अध्यक्ष छावा प्रतीष्ठान चिरनेर
आमचे गार्ड हे लक्ष ठेवून आहेत.परंतू क्षेत्र खूप मोठे आहे व गार्डची संख्या खूप कमी आसल्याने वणवे लावणारे सापडणे कठीण जात आहे.तरीही या भागातील सामाजीक संस्थाही वणवे विझवीण्यासाठी आम्हाला चांगले सहकार्य करत आहेत. तसेच वनवीभागा तर्फे वारंवार जनजागृतीही करत आहोत.तरीही वणवे लावणार्यांची खबर आम्हाला द्य्या.आम्ही त्यांच्यावर सक्त कारवीई करू.
शशांक कदम : विभागीय वन आधीकारी वनविभाग
उरण








Be First to Comment